शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचे पक्षफुटीनंतरही बारामतीच्या सहकार क्षेत्रात वर्चस्व; सभासदांनी शरद पवारांना पूर्णपणे नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:27 IST

Baramati Malegaon Sugar Factory Election Result 2025: लोकसभेला भरभरुन साथ देणाऱ्या या माळेगावच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी यंदा मात्र, शरद पवार गटाला पूर्ण नाकारल्याचे स्पष्ट झाले

Malegaon Factory Election Result: राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबियांत फुट पडल्यानंतर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याची निवडणुक लढविण्यात आली. यामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी २० जागा जिंकत ‘माळेगावं’चा गड राखला. माळेगावच्या सभासदांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिला आहे. 

यंदा प्रथमच खुद्द अजित पवार हे थेट कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर करीत उतरले. तसेच कारखान्याच्या चेअरमन पदासाठी स्वत:च्या नावाची  घोषणा करत रणनीती आखली. शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील अजित पवार यांच्याबरोबर या निवडणुकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली. या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे अथव पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांबरोबर चर्चा झाली नसल्याचे पवार यांनी नुकतेच सांगितले. मात्र, शरद पवार गटाबरोबर चर्चा अपयशी ठरली. या अपयशाचे कारण उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘सस्पेन्स’ ठेवले. याशिवाय गुरुशिष्यांच्या जोडीसमवेत देखील अजित पवार यांनी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने निवडणुक लढली गेली. दोन्ही पॅनलला मिळालेले मतदानाची आकडेवारी अटीतटीच्या लढतीची साक्ष देते. सत्ताधारी गटाचा तुलनेने अल्प मतांनी पराभव झाला आहे. मतांमधील हा फरक मिटविण्यासाठी राष्ट्रवादी भविष्यात विशेष प्रयत्न करावे लागतील. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या वयाचा मुद्दा आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर केलेले आरेापांची यावेळी निवडणुकीत चर्चा झाली. त्याचप्रमाणे चंद्रराव तावरे यांनी या वयात मिळविलेला विजय बारामतीच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.

साखर कारखाने, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, दूध संघ आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आजवर अजित पवार यांचा प्रभाव वेळोवेळी दिसून येतो. माळेगाव कारखाना, माळेगाव ग्रामपंचायत त्यास अपवाद असे. त्यामुळे राज्यातील सत्तापरिवर्तनानंतर माळेगावमध्ये परिवर्तन करायचेच, असा चंग अजित पवार यांनी २०१९ मध्येच बांधला. त्यामध्ये ते यशस्वी ठरले. यंदा  राज्यात महायुतीमध्ये घटकपक्ष असणार्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या अजित पवार यांना वर राज्यात राजकीय प्रतिष्ठा राखण्यासाठी ‘माळेगांव’वर सत्ता मिळविणे महत्वाचे होते. त्यामुळे पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनला होता. पवार यांनी गुरु शिष्याच्या जोडीला टक्कर देण्यासाठी राजकीय फिल्डिंग लावली. 

तालुक्यातील संस्था पदाधिकारी, राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना निवडणुकीत झाडून उतरविले. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनेल विरुद्ध सत्ताधारी सहकार बचाव शेतकरी पॅनलमध्ये 'काटे की टक्कर' यंदा अनुभवयास मिळाली. उमेदवारांनी मते विकत घेण्यासाठी पैशाचे वाटप केले. त्यातून पैशांचा अक्षरश: पाऊस पडल्याचे आरोप तावरे गटाने केले. याबाबत  माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात रंगली होती. मतदान करताना अनेक ठिकाणी क्रॉस व्होटिंग झाल्याचे जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

 माळेगाव कारखान्याच्या राजकारणात चंद्रराव तावरे मागील ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्या काळात झालेल्या सत्ता संघर्षात त्यांनी १९९७ साली अजित पवार यांच्या पॅनेलच्या विरोधात निवडणूक लढविली. मोठ्या मतांच्या फरकाने त्यांचे पॅनल निवडून आले. त्याची चर्चा राज्यभर झाली. त्यानंतरच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चंद्रराव तावरे व अजित पवार यांच्यात दिलजमाई केली. पुढची निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, राजकीय मतभेद तावरे-पवार यांचे कायम राहिले. २०१५ च्या माळेगाव कारखाना निवडणुकीत चंद्रराव तावरे, रंजन तावरे हे जुने गुरु-शिष्य पुन्हा एकत्र आले. त्यांच्या नेवृत्वाखालील पॅनेलने एकूण २१ जागांपकी १५ जागा जिंकून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कारखान्याची सत्ता खेचून घेतली. पवार यांच्या पॅनेलला फक्त सहा जागांवरच समाधान मानावे लागले होते. पवार यांनी तो वचपा काढत २०१९ मध्ये  १७ जागांवर विजय मिळविला. तर २०२५ मध्ये या जागांमध्ये वाढ झाली आहे. विरोधकांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. मात्र,‘माळेगांव’ पुढील  आव्हाने पाहता चेअरमनपदाचा मुकुट उपमुख्यमंत्री पवार यांच्यासाठी काटेरी ठरणार आहे.

 सहकारातील पहिल्याच निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवारांची अवस्था दयनीय झाली आहें. खरी लढत अजित पवार आणि गुरुशिष्याच्या पॅनल मध्ये झाल्याचे दिसून आले. लोकसभेला भरभरुन साथ देणाऱ्या या माळेगावच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी यंदा मात्र, शरद पवार गटाला पूर्ण नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीनंतर दोन्ही पवार गटातील अंतर वाढण्याचे संकेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSugar factoryसाखर कारखाने