शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

'अपयशाने खचून जाऊ नका...' विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सांगितली महायुतीची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 13:20 IST

लोकसभेच्या वेळी आम्ही विकासावर बोलत होतो, ते सर्व बाजूला ठेवून घटना बदलतील, असा खोटा प्रचार केला गेला

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला अपयश आलं; पण अपयशाने खचून जायचे नसते. कालच्या विधान परिषदेत आपले दोन आमदार निवडून आले. यश पण पचवायला शिकलं पाहिजे. अपयश आलं तरी लोकांसमोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. त्याचबरोबर आजची सभा राष्ट्रवादीची आहे. मात्र, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेतल्या जातील. महायुती आणि मित्र पक्षांच्या सभा प्रत्येक विभागात, जिल्ह्यात होणार आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभा निवडणुकीची रणनीती सांगितली.

बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान महामेळावा आणि जाहीर सभेत पवार यांनी त्यांची रणनीती सांगितली. तसेच महायुतीच्या माध्यमातूनच राष्ट्रवादी निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. विधानसभेचे मतदान होईपर्यंत राष्ट्रवादीची जनसन्मान रॅली थांबणार नसल्याचे देखील पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुती आतापासूनच कामाला लागल्याचे या सभेवरून दिसून आले.

लोकसभा निवडणुकीत सहानभुतीचे राजकारण यशस्वी ठरले. यंदा विधानसभा निवडणुकीत देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहानभुतीचे राजकारण पुन्हा डोकावणार असल्याची शक्यता गृहीत धरून बारामतीकरांना आवाहन केले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोणी भावनिक करत असेल तर भावनिक होऊ नका त्यातून विकास होत नाही. बारामती बघत बघत मला महाराष्ट्र फिरायचे आहे, त्यामुळे हे काम माझ्या घरचे नसून सर्वांचे आहे. असे समजून इथल्या माझ्या लोकांनी जबाबदारी पार पाडायची आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

लोकसभेला वेगळे वातावरण निर्माण झाले. आम्ही विकासावर बोलत होतो, त्या सर्वांना बाजूला ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली ती घटना बदलतील, असा खोटा प्रचार केला गेला. तुमच्या-माझ्या महाराष्ट्रात काम करत असताना महिला, पुरुष, वृद्ध, तरुण, मुलींवर अन्याय होणार नाही, असा शब्दही अजित पवार यांनी यावेळी दिला. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत राज्यघटनेला कोण धक्का लावणार नाही. आता कोण असे गैरसमज निर्माण करत असेल तर त्याला ठासून सांगा, आमचा अजितदादांवर विश्वास आहे, ही आपली भूमिका सर्वांना सांगा, असेही अजित पवार म्हणाले. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी लोकसभेतील अपयशाचे मुद्दे यंदा प्रभावीपणे खोडून काढण्याचा प्रभावी प्रयत्न सुरुवातीपासूनच चालविल्याचे दिसून आले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण