Pune: पुण्यात अजित पवार समर्थक बाबुराव चांदेरेची रिक्षाचालकास मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 20:48 IST2023-07-24T20:47:24+5:302023-07-24T20:48:20+5:30
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल...

Pune: पुण्यात अजित पवार समर्थक बाबुराव चांदेरेची रिक्षाचालकास मारहाण
पुणे : पुण्यातील अजित पवार समर्थक बाबुराव चांदेरे यांची रिक्षाचालकास मारहाण केली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना बाणेर भागात घडली. वाहतूक सुरळीत करताना चांदेरे यांनी रिक्षाचालकास मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
बाबुराव चांदेरे हे पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आहेत. चांदेरे सध्या अजितदादा गटाचे पुणे मनपाचे माजी नगरसेवक आहेत. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुण्यात अजित पवार समर्थकांची दादागिरी सुरू झाल्याचे सोशल मीडियावर नेटकरी बोलत आहेत. चांदेरेंनी रिक्षाचालकास मारहाण केल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यानेही रिक्षाचालकास मारहाण केली आहे.
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक बाबुराव चांदेरेची रिक्षाचालकास मारहाण#Punepic.twitter.com/YHZ7nG6FL5
— Lokmat (@lokmat) July 24, 2023
या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओवर समिश्र प्रतिक्रिया येत आहेत.