शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंच्या 'पुणे जिल्हा भगवा करू' वक्तव्यावर अजित पवार स्पष्टच बोलले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:49 IST

एकनाथ शिंदे यांच्या पुणे जिल्हा भगवा करू या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी राज्यातील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी सरकारकडून विशेष मोहिम राबवली जात असल्याचे सांगितले. बालकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.  तसेच, पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करत असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, उद्याच्या (३ मार्च) तारखेला पुरवणी मागण्या मान्य करण्यात येणार आहेत. आम्ही अर्थसंकल्प सादर करणार असून, सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू."

 यावेळी त्यांनी पक्ष वाढीबाबत भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे यांच्या पुणे जिल्हा भगवा करू या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, तुम्ही कितीही प्रश्न विचारा, आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पुणे जिल्हा भगवा करण्याची इच्छा शिंदे गटाला आहे, तसेच प्रत्येक पक्ष आपल्या जिल्ह्यासाठी वेगवेगळे दावे करू शकतो. कालवा समिती बैठक आणि गृहमंत्री वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना अजित पवार पुढे म्हणाले, दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन केले जाते. यात काही विशेष निर्णय नाही, हे नियोजनाचेच काम आहे.राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, 'मी कोणत्याही विशिष्ट प्रकरणावर बोलत नाही. परंतु, तक्रारी आल्यास पोलीस तत्काळ कारवाई करतात. माध्यमं काहीवेळा घाई करतात, परंतु कायदा सुव्यवस्था राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.'वसंत मोरे यांच्याशी संबंधित तोडफोड या प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितले, "सत्यता पुढे येऊ द्या. आरोपी सापडत नसेल म्हणून तोडफोड करणे योग्य नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांकडून नुकसान वसूल करावे, असे कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे." तानाजी सावंत यांचे टेंडर रद्द  तानाजी सावंत यांचे टेंडर रद्द केल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले,माध्यमांतून मी ही माहिती घेतली आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल.पीएमपीएल डेपो मॅनेजरविरोधात तक्रारीपीएमपीएलमध्ये डेपो मॅनेजर महिलांना आणि ड्रायव्हरांना त्रास देत असल्याच्या तक्रारीबाबत अजित पवार म्हणाले, मी या प्रकरणाची माहिती घेतली असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVasant Moreवसंत मोरे