अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 06:31 IST2025-11-07T06:30:59+5:302025-11-07T06:31:27+5:30

शासनाची १५२ कोटींची फसवणूक; मुद्रांक शुल्क भरले फक्त ५०० रुपये; अमेडिया कंपनीचा पत्ता पार्थ पवारांच्या घराचा

Ajit Pawar son Parth's land scam Land worth 1800 crores purchased for 300 crores | अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन

अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन

समिती करणार चौकशी; सह दुय्यम निबंधकावर निलंबनाची कारवाई; अजित पवार यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणेः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून १,८०० कोटींचे बाजारमूल्य असणारी जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या खरेदी व्यवहारात शासनाची १५२ कोटींची फसवणूक फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. यात सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. यावरून राजकीय राळ उठली असून, अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत.

मुंढवा येथील जमीन प्रकरणात मालमत्ता पत्रकावर राज्य सरकारची मालकी असताना खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला. जमीन विक्रीची परवानगी घेण्यापूर्वी जमीन मूल्याच्या ५० टक्के नजराणा भरणे अपेक्षित असताना संबंधित कंपनीने तो न भरताच सातबारा उताऱ्याच्या आधारे व्यवहार पूर्ण केला.

यातून १४६ कोटी रुपयांची, तसेच व्यवहार करताना दोन टक्के मुद्रांक शुल्काची सहा कोटी रुपयांची रक्कम भरली नाही. त्यामुळे राज्य सरकारची १५२ कोटी रुपयांची फसवणूक झाली. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया एंटरप्राईजेस एलएलपी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या कंपनीचा पत्ता पार्थ पवार यांचा रहिवासी बंगला

जमीन खरेदीची सखोल चौकशी करणार : मुख्यमंत्री
१. नागपूर : पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भात सर्व माहिती मागविली असून योग्य चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीच्या आधारावर यासंदर्भात पावले उचलू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
२. प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर आले आहेत ते गंभीर आहेत. त्याबाबत पूर्ण माहिती घेऊनच बोलेना उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील कुठल्याही प्रकाराला पाठीशी घालणा नाहीत. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

मुंबई: पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक सुहास दिवसे यांच्यामार्फत सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक (मुख्यालय), पुणे राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. सात दिवसांत ही समिती अहवाल सादर करेल.

सह दुय्यम निबंधकासह तिघांवर गुन्हा दाखल

जमीन व्यवहार प्रकरणी संतोष हिंगणे (सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यारपत्र असलेली शीतल किशनचंद तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आधीच सांगितले होते, चुकीचे व्यवहार मान्य नाहीत : अजित पवार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पुण्यातील कथित जमीन व्यवहार प्रकरणाशी आपला दुरान्वयानेही संबंध नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. परंतु, त्याचवेळी मागे तीन-चार महिन्यांपूर्वी अशा प्रकारच्या गोष्टींची चर्चा ऐकली होती आणि त्यावेळीच मी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, कोणतेही चुकीचे व्यवहार मला मान्य नाहीत, असेही त्यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, त्यानुसार ती चौकशी जरूर व्हावी आणि सत्य काय आहे ते समोर यावे. सदर व्यवहारातील पत्ता हा माझ्या वैयक्तिक घराचा नसून, तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या नावावर असल्याचेही पवार यांनी सांगितले. मुले सज्ञान होतात तेव्हा त्यांचा व्यवसाय करतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

माझा पाठिंबा नाही

अजित पवार म्हणाले, आजपर्यंत भी कुठल्याही नातेवाईकांच्या संदर्भात अधिकाऱ्यांना फोन केला नाही किंवा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केला नाही. माझ्या नावाचा दुरूपयोग करून कुणी चुकीचे काम करत असेल, तर त्याला माझा कोणताही पाठिंबा नाही.

Web Title : पार्थ पवार का भूमि घोटाला: 300 करोड़ में 1800 करोड़ की जमीन खरीदी

Web Summary : पार्थ पवार की कंपनी पर 300 करोड़ रुपये में 1800 करोड़ रुपये की जमीन खरीदने और सरकार को 152 करोड़ रुपये का धोखा देने का आरोप है। जांच जारी है, एक अधिकारी निलंबित। विपक्ष ने अजित पवार के इस्तीफे की मांग की। मुख्यमंत्री ने जांच के आदेश दिए, कहा गलत काम बर्दाश्त नहीं किया जाएगा। अजित पवार ने शामिल होने से इनकार किया।

Web Title : Parth Pawar's Land Scam: 300 Crore Purchase of 1800 Crore Land

Web Summary : Parth Pawar's company allegedly bought land worth ₹1800 crores for ₹300 crores, defrauding the government of ₹152 crores. An inquiry is underway, and an official has been suspended. Opposition demands Ajit Pawar's resignation. Chief Minister orders investigation, emphasizing zero tolerance for wrongdoing. Ajit Pawar denies involvement.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.