शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Plane Crash: केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा; रोहित पवारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:47 IST

Ajit Pawar Plane Crash पोलिसांनी आणि सीआयडीने गुन्हा दाखल करून घेतला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा रोहित पवार यांनी यावेळी दिला आहे

पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. हा तपास योग्य दिशेने होण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी जीडीसीए (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रोहित पवार यांनी मुंबई आणि बारामती पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवारी पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग हे तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याशी संबंधित असून त्यांच्या कंपनीला चंद्राबाबूंनी आर्थिक रसद पुरवलेली आहे, तसेच चंद्राबाबूंच्याच पक्षाचे खासदार राम मोहन नायडू हे केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री आहे. विमान अपघात झाल्यानंतर राम मोहन नायडू यांनी विमानाची तपासणी योग्य पद्धतीने झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता व्हीएसआर कंपनीच्या विमानात दोष असल्याचे जीडीसीएने जाहीर करत पाच विमानांवर कारवाई केली आहे. यावरून विमान कंपनीच्या मालकाला कोणी तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे स्पष्ट होते. याचा तपास चुकीच्या दिशेने केला जात आहे. हा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, तसेच तेलगू देसम पक्षाच्या कोणत्याही नेत्याला हे मंत्रालय देऊ नये. विमान कंपनीच्या भाजपच्या काही नेत्यांचाही संबंध आहे, त्यामुळे ते मला लक्ष्य करत आहेत, असेही रोहित पवार म्हणाले.

विमान अपघातास जीडीसीए (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) आणि व्हीएसआर कंपनी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करत आहोत. गुन्हा दाखल केला जात नसल्याने हा घातपात असल्याची शंका येत आहे. गुन्हा दाखल व्हायला हवा. मात्र, तो आम्ही दाखल करून घेऊ शकत नाही, समजून घ्या, असे पोलिस म्हणतात. अपघाताचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर सीआयडीच्या हातात काही राहत नाही. सीबीआयचे अधिकारी महाराष्ट्र आणि अजित पवार यांना कितपत ओळखतात, माहिती नाही. त्यामुळे आम्ही एफआयआर नोंदवून घ्या, अशी मागणी करत आहोत. भाजप नेते सुशांतसिंग यांच्यासाठी कपडे काढून रस्त्यावर उतरत होते. मात्र, त्यांचेच मित्र असलेले अजित पवार यांच्या मृत्यूची फिर्याद नोंदवून घेत नाहीत. सत्तेतीलच काही लोक फिर्याद नोंदवण्यास आडकाठी आणत आहेत. पोलिसांनी आणि सीआयडीने गुन्हा दाखल करून घेतला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही यावेळी रोहित पवार यांनी दिला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बिनविरोध आमदार करावे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो. बारामती विधान सभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकी यांच्या विरोधात कोणत्याही उमेदवाराने उभे राहू नये, त्यांची निवड बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली.

कुणाच्या घराची व ब्युटी पार्लरची बिले पक्षाच्या खात्यातून गेली

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, आम्हाला अजित दादांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्या बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. कोणाच्या घरातील कामाची बिले आणि कोणाच्या ब्युटी पार्लरची बिले पक्षाच्या खात्यातून देण्यात आली आहेत, याची माहिती आमच्याकडे आहे., 

टॅग्स :PuneपुणेPlane Crashविमान दुर्घटनाAjit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारPoliticsराजकारणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार