Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारी रोजी अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. व्हीएसआर कंपनीचे विमान मुंबईवरून सकाळी निघाले होते, हे विमान बारामतील विमानतळ परिसरात ८.४५ ला कोसळले. या विमानाचा जमिनीवर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. दरम्यान, आता या विमान अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. आमदार रोहित पवार यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तर ब्लॅक बॉक्सचेही नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. आता बारामती पोलिस ठाण्यातील डायरीमधून 'ब्लॅक बॉक्स' बाबत मोठी माहिती समोर आली आहे.
जगात मोठी मागणी, पण इस्रायल फक्त भारताला हे शस्त्र देणार; ब्राह्मोसपेक्षाही आहे घातक
अजित पवार यांचा ज्या विमानामुळे अपघात झाला, त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. आधी ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळाल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. क बॉक्स सुस्थितीत असल्याबाबतची नोंद बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीमध्ये करण्यात आली आहे.
ब्लॅक बॉक्सची पोलिस ठाण्यात नोंददिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सापडलेला 'ब्लॅक बॉक्स' सुरक्षित अवस्थेत बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे AIB चे अधिकारी के. रामचंद्र यांनी या ब्लॅक बॉक्सची पाहणी करून तो सुरक्षित असल्याची नोंद केली होती. इतकेच नाही, तर बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात आल्याची आणि स्टेशन डायरीमध्ये ऑनलाईन नोंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एका पॅकेजमध्ये हा ब्लॅक बॉक्स आणि विमानाचे इतर भाग ठेवण्यात आल्याचे समोर आले. त्यावर Aircraft Accident Investigation Bureau चा शिक्का असल्याचे दिसत आहे.
Web Summary : Ajit Pawar's plane crash black box is safe, contrary to earlier reports of damage. Baramati police station records confirm its secure storage after the accident, verified by AIB officials.
Web Summary : अजित पवार के विमान दुर्घटना का ब्लैक बॉक्स सुरक्षित है, क्षति की शुरुआती खबरों के विपरीत। बारामती पुलिस स्टेशन के रिकॉर्ड दुर्घटना के बाद इसके सुरक्षित भंडारण की पुष्टि करते हैं, जिसकी एआईबी अधिकारियों ने पुष्टि की है।