शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:12 IST

अजित पवार गटाचे ९ उमेदवार आघाडीवर आहेत, तर शरद पवार गटाचे दोन उमेदवार आघाडीवर

माळेगांव : माळेगांव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची  मतमोजणी बुधवारी(दि २५) सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरु आहे. पहिल्याच निकालात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजी मारली आहे. पवार यांंनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत 'ब' वर्गातुन दणदणीत विजय मिळवला. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह ९उमेदवार त्यांंच्या गटाचे निवडुन आले आहेत. तर सहकार बचाव पॅनल चे नेते, माळेगावं चे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे पराभूत झाले आहेत. त्यामुळे अजित पवार हे माळेगांवचा गड राखण्यात यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या रुपाने माळेगावला नवा कारभारी मिळाला आहे. तर शरद पवार गटाची पिछाडी कायम आहे.

त्यानंतर त्यांंच्याच गटाचे अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गातून रतनकुमार भोसले यांना ८६७० मते मिळाली, तर विरोधी गटाचे उमेदवार बापुराव गायकवाड यांना ७१८३ मते मिळाली. भोसले हे १४८७ मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. मागास प्रवर्गातून नितीन शेंडे यांना ८४९४ मते मिळाली. तर सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे यांना ७३४१ मते मिळाली. शेंडे यांचा ११५३ मतांनी विजय झाला. भटक्या विमुक्त जाती जमती प्रवर्गातून विलास देवकाते आणि महिला राखीवमधुून संगीता कोकरे आणि ज्योती मुलमुले या विजयी झाल्या आहेत. देवकाते यांचा २२२७ मतांनी विजय झाला आहे. बाळासाहेब तावरे, शिवराज राजे जाधवराव, राजेंद्र बुरुगले निवडून आले आहेत. तर विरोधी गटाचे नेते रंजन तावरे पराभूत झाले आहेत.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय भवन बारामती येथे मतमोजणी पार पडत आहे. या मध्ये ब वर्ग प्रतिनिधीची मतमोजणी प्रारंभी झाली ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार होते. प्रथम ब वर्गासाठी मतमोजणी झाली. या वर्गात ९९ टक्के मतदान झाले होते. अपेक्षेप्रमाणे सर्व संस्थावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांना १०१ त्यापैकी तब्बल ९१ एवढी मते पडली तर विरोधी सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांना 

१० एवढीच मते मिळाली

 अजित पवार गटाचे याेगेश जगताप,तानाजी कोकरे, स्वप्नील जगताप,गणपतराव खलाटे, प्रताप आटोळे, सतीश फाळके,अविनाश देवकाते,जयपाल देवकाते,देविदास गावडे हे उमेदवार आघाडीवर आहेत. तर तावरे गटाचे चंद्रराव तावरे,रणजित खलाटे हे दोन उमेदवार आघाडीवर आहेत.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSugar factoryसाखर कारखाने