'माळेगाव' च्या रणसंग्रामात खुद्द अजित पवार उतरले 'ब'वर्गातून केला अर्ज दाखल; शेवट च्या दिवशी ५९३ उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 22:04 IST2025-05-27T22:04:32+5:302025-05-27T22:04:57+5:30

आज आज खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'ब' वर्ग मतदार संघातून अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे.  

Ajit Pawar himself entered the battle of Malegaon filed his application from 'B' category; 593 candidatures filed on the last day | 'माळेगाव' च्या रणसंग्रामात खुद्द अजित पवार उतरले 'ब'वर्गातून केला अर्ज दाखल; शेवट च्या दिवशी ५९३ उमेदवारी अर्ज दाखल

'माळेगाव' च्या रणसंग्रामात खुद्द अजित पवार उतरले 'ब'वर्गातून केला अर्ज दाखल; शेवट च्या दिवशी ५९३ उमेदवारी अर्ज दाखल

बारामती - माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुक प्रक्रिया सध्या सुरु आहे.शेवटच्या दिवशी ५९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.राज्याच्या राजकारणातील मातब्बर नेते अजित पवार आणि गुरुशिष्य या निवडणुकीत आमनेसामने उतरल्याने उभ्या महाराष्ट्राचे या निवडणुकि कडे लक्ष लागले आहे.त्यात आज आज खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'ब' वर्ग मतदार संघातून अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे.  

  १३ जून रोजी उपमुख्यमंत्री पवार यांनी नुकत्याच पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात  कारखाना अध्यक्ष पदाचा चेहरा घोषित करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यातच खुद्द पवार यांनी त्यांचा  उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीचा 'सस्पेन्स' वाढला आहे. छत्रपती कारखाना निवडणुकी पाठोपाठ माळेगाव कारखाना जिंकण्याची पवार यांनी जोरदार तयारी केली आहे. या निवडणुकीत हातात असलेल्या सर्व यंत्रणाचा वापर करणार असल्याचे देखील पवार यांनी सूचित केले आहे. त्यामुळे स्वतः चा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात  पवार यांनी कोणती रणनीती आखली आहे, याबाबत राजकीय वर्तुळत चर्चा रंगली आहे. दरम्यान, आजपर्यँत २१ जागांकरिता  एकूण ५९३ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी शरद पवार गटासह अन्य दिग्गज  उमेदवारांनी अर्ज दाखल केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या निवडणुकीत उतरली आहे.'छत्रपती 'च्या निवडणुकीत तटस्थ राहणाऱ्या शरद पवार गटाने अद्याप कोणतीही राजकीय भूमिका जाहीर केलेली नाही.

 उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या विरोधात सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून चंद्रराव तावरे तसेच माजी चेअरमन रंजन तावरे यांनी आव्हान दिले आहे.   २८ मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. २९ मे ते १२ जून उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. १३ जून रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.

माळेगाव गटातून ५१, पणदरे ७९, सांगवी ५४, खंडज- शिरवली ६६ , निरावागज ५९, बारामती ७९, महिला राखीव ६८, अनुसूचित जाती जमाती वीस, भटक्या जमाती ६४, इतर मागास प्रवर्ग २५, ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन २८  अर्ज दाखल झाले आहेत.

Web Title: Ajit Pawar himself entered the battle of Malegaon filed his application from 'B' category; 593 candidatures filed on the last day