शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

"१० कोटी खर्च करून दसरा मेळाव्याला गर्दी केली"; अजित पवारांची एकनाथ शिंदेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 16:28 IST

सटी बस दसरा मेळाव्यासाठी गेल्याने सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाली होती...

बारामती (पुणे): मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात काहींची भाषणं फारचं लाबंली. आता कुणाची लांबली ते तुम्हीच विचार करा, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष गटाला टोला लगावला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला.

पवार पुढे म्हणाले, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकायला मुंबईत यायचे, ही परंपरा आहे. पण दसरा मेळाव्यासाठी १० कोटी रुपये खर्च करून मेळाव्याला गर्दी जमा केली गेली. यासाठी एसटी बससेचा उपयोग केला गेला. मात्र, अनेक एसटी बस दसरा मेळाव्यासाठी गेल्याने सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाली होती.

'शिवसैनिकांनी योग्य निर्णय घ्यावा'

'मी दोघांचीही भाषणं ऐकली. पहिलं उद्धव ठाकरेंचं झालं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंचं झालं. दोघांनी काय भाषणं केली हे सर्वांनी पाहिलं. यावर आम्ही जास्त टीका-टिपण्णी करण्याची गरज नाही. आता याबद्दल बारकाईने विचार करून महाराष्ट्रातल्या जनतेने, मतदारांनी आणि विशेषतः शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचा आहे. पुढे काय केलं पाहिजे, भूमिका काय असली पाहिजे, कुणाच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे, कुणाची शिवसेना मूळ शिवसेना आहे, याचा विचार त्यांनी करावा', असं अजित पवार म्हणाले.

'मुख्यमंत्र्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे'-

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या कमीपणामुळे गेला. राज्यात जे सरकार आहे, त्याच विचाराचं सरकार केंद्रातही आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गेल्याने राज्यातील दोन लाख तरुणांचा रोजगार गेला आहे. यातून तरुणांचा रोष हा आपल्यावर येईल, हे झाकण्यासाठी वक्तव्य केलं गेलं. विधानसभेतही मुख्यमंत्र्यांनी वेदांता प्रकल्प येतोय, हे भाषणात सांगितलं होतं. तुम्हीच आता टक्केवारीचा आरोप करताय, हे निरर्थक आहे. कोणी किती टक्केवारी मागितली हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं, असं आव्हान पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं. झेंडा शिवसेनेचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा अस मी कधीही ऐकलं नाही. काल केलेली वक्तव्यं राजकीय असल्यामुळे त्याला जास्त महत्व द्यायच नसते, असेही पवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDasaraदसरा