शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आगरोधक यंत्रणा जुनीच

By admin | Updated: May 19, 2015 01:04 IST

हजारो लिटरचा साठा असणाऱ्या शहरातील ६० पैकी ५० पेट्रोलपंपांची नियमित अग्निप्रतिबंधक तपासणीच होत नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

पेट्रोलपंपांवरील स्थिती : ६० पैकी ५० पेट्रोलपंपांची तपासणीच नाहीपेट्रोल आणि डिझेल अशा ज्वलनशील पदार्थांचा हजारो लिटरचा साठा असणाऱ्या शहरातील ६० पैकी ५० पेट्रोलपंपांची नियमित अग्निप्रतिबंधक तपासणीच होत नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. पेट्रोल कंपन्यांकडून केवळ एचपी क्लबमध्ये समाविष्ट असलेल्या १० पेट्रोलपंपांच्या सुरक्षेकडेच लक्ष दिले जात असून, इतर पंपांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. नागपूर येथील एक पेट्रोलपंप आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मोठ्या दुर्घटनेला सामोरे जाण्याची घटना नुकतीच घडली. यापार्श्वभूमीवर पुणे शहरातील पेट्रोलपंपांच्या सुरक्षेचा आढावा घेतला असता, अग्निप्रतिबंधक यंत्रणेतील अनेक त्रुटी उजेडात आल्या आहेत. पेट्रोलपंपांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचे निकष पेट्रोल कंट्रोल बोर्डाकडून निश्चित करून देण्यात आले आहेत.पेट्रोल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून केवळ एचपी क्लबमधील १० पेट्रोलपंपांची दर तीन महिन्यांनी तपासणी केली जाते. शहरातील उर्वरित ५० पेट्रोलपंपांची मात्र कोणतीही तपासणी होत नाही. पेट्रोलपंपावर फायर एक्स्टिंग्युशर, रेतीच्या बादल्या, पाण्याचे ड्रम ठेवणे बंधनकारक आहे. फायर एक्स्टिंग्युशर वापर झाला किंवा नाही झाला तरी ते दर वर्षी बदलणे बंधनकारक आहे. पंपांवरील कर्मचाऱ्यांना ते वापरण्याचे प्रशिक्षण देणे, तसेच त्यांच्याकडून मॉकड्रील करून घेण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, एचपी क्लबमधील पेट्रोलपंपांचा अपवाद वगळता बहुतांश पेट्रोलपंपांवर या निकषांचे काटेकोरपणे पालन होत नाही. अनेक पेट्रोलपंपांवरील फायर एक्स्टिंग्युशर आऊट डेटेड झाले असून, ते कुठल्यातरी कोपऱ्यात पडून आहेत. त्याचा वापर करण्याचे ज्ञान खूपच कमी कर्मचाऱ्यांना आहे. एनओसीचे नूतनीकरणच नाही ४पेट्रोलपंप सुरू झाल्यानंतर सुरूवातीला एकदाच अग्निशमन विभागाकडून त्यांना ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावे लागते, त्यानंतर मात्र त्याचे नूतनीकरण करण्याची कोणतीही तरतूद फायर अ‍ॅक्टमध्ये नाही. ४मॉल, मल्टिफ्लेक्स, थिएटर, मंगल कार्यालये यांना दर वर्षी नूतनीकरण करावे लागत असताना ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा करणाऱ्या पेट्रोलपंपांना एनओसीचे नूतनीकरण करण्याचे कोणतेही बंधन नाही. एच क्लबमधील पेट्रोलपंपांची कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून दर ३ महिन्यांनी तपासणी केली जाते, तसेच इतर पेट्रोलपंपांची वर्षातून एकदा तपासणी होते. पेट्रोलपंपांवरील फायर एक्स्टिंग्युशर दर वर्षी नियमितपणे बदलले जाते. कर्मचाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.’’- अली दारूवाला, प्रवक्ते, आॅल इंडिया पेट्रोल-डिझेल डीलर असोसिएशन पेट्रोलपंपचालकांनी त्यांना ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देताना ठरवून दिलेल्या निकषांचे पालन करणे बंधनकारक आहे. पेट्रोलपंपावर आग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. पेट्रोलपंपांची तपासणी करताना त्या निकषांचे पालन केले नसल्याचे आढळून आल्यास त्यांची एनओसी रद्द करण्याची कारवाई केली जाईल.- प्रशांत रणपिसे, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी