शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भोरमधून यंदा पुन्हा थोपटे विरुद्ध थोपटे

By admin | Updated: June 11, 2015 06:03 IST

पुणे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी दूध संस्था मतदारसंघातून भोर तालुक्यातून चार उमेदवारी अर्ज दाखल झाले होत. काल माघारी घेण्याच्या शेवटच्या

भोर : पुणे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी दूध संस्था मतदारसंघातून भोर तालुक्यातून चार उमेदवारी अर्ज दाखल झाले होत. काल माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन जणांनी माघार घेतल्याने विद्यमान संचालक दिलीप थोपटे यांच्या विरुद्ध माजी संचालक बाळासाहेब थोपटे यांच्यात गतवेळीप्रमाणेच दुरंगी लढत होणार आहे. मात्र, दिलीप थोपटे यांना मानणारे ४७ दूध संस्थांचे मतदार अज्ञातस्थळी असल्याने, दिलीप थोपटे यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.विद्यमान संचालक दिलीप थोपटे, माजी संचालक बाळासाहेब थोपटे, भिकोबा थोपटे व रूपाली थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काल माघारीच्या शेवटच्या दिवशी भिक ोबा थोपटे व रूपाली थोपटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. दरम्यान, एकाच घरातील तीन जणांना उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाहीत. या सहकाराच्या नियमानुसार बाळासाहेब थोपटे यांनी दिलीप थोपटे यांच्या उमेदवारी अर्जाच्या विरोधात कात्रज दूध संघाचे निवडणूक अधिकारी राठोड यांच्याकडे याचिका दाखल केला होती. मात्र, सुनावणीत निवडणूक अधिकारी यांनी सदरचा अर्ज फेटाळला. त्यामुळे बाळासाहेब थोपटे यांनी दिलीप थोपटे यांच्या उमेदवारीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, निवडणूकप्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नसल्याचे कारण देत न्यायालयाने याचिका फेटाळली. यामुळे दिलीप थोपटे यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे निवडणुकीसाठी विद्यमान संचालक दिलीप थोपटे यांच्या विरुद्ध बाळासाहेब थोपटे या भावकीतच पुन्हा एकदा सामना रंगणार आहे. तालुक्यातील ६० दूध संस्था जिल्हा संघाला दूध घालतात. त्याच संस्था मतदानाला पात्र आहेत. दिलीप थोपटे यांनी त्यांना मानणाऱ्या सुमारे ३५ ते ४५ संस्थांचे मतदार प्रतिनिधी पाठवले असून, त्यातील अनेक मतदार बाहेर आहेत. शिवाय राष्ट्रवादीला मानणारे ५ मतदार असून, त्यांचाही दिलीप थोपटे यांनाच पाठिंबा असल्याचे बोलले जाते. (वार्ताहर)