धर्मराज यात्रा उत्सवानिमित्त वीस वर्षांनंतर निरगुडसरमध्ये पुन्हा एकदा होणार भिर्रर्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 11:05 IST2025-05-14T11:04:27+5:302025-05-14T11:05:01+5:30

बैलगाडा विजेत्यांना एकूण चार लाख लाख १२ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे.

After twenty years, a huge procession will be held in Nirgudsar once again on the occasion of the Dharmaraj Yatra festival... | धर्मराज यात्रा उत्सवानिमित्त वीस वर्षांनंतर निरगुडसरमध्ये पुन्हा एकदा होणार भिर्रर्र...

धर्मराज यात्रा उत्सवानिमित्त वीस वर्षांनंतर निरगुडसरमध्ये पुन्हा एकदा होणार भिर्रर्र...

 निरगुडसर : वीस वर्षानंतर पुन्हा एकदा निरगुडसरमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पाहावयास मिळणार असून, बैलगाडा घाटात भिर्र.. होणार आहे. येथील बैलगाडा शर्यतीच्या नवीन घाटाच्या कामासाठी लोकमतने पाठपुरावा केल्यानंतर हे काम मार्गी लागल्यामुळे लोकमत दैनिकाचे बैलगाडा मालक व शौकीनांनी आभार मानले आहेत.

निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्री धर्मराज महाराजांचा यात्रा उत्सव शुक्रवार (ता. १६) आणि शनिवार (ता. १७) व रविवार (ता. १८) होणार आहे. त्यानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. बैलगाडा विजेत्यांना एकूण चार लाख लाख १२ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित केल्याची कुस्त्यांचा आखाडा आणि रात्री दहा वाजता तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा तमाशा कार्यक्रम होणार आहे.

माहिती यात्रा उत्सव समितीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली असल्याची माहिती सरपंच रवींद्र वळसे पाटील यांनी दिली आहे. सोमवारी सकाळी पाच ते सात श्रींची महापूजा, अभिषेक, मांडव डहाळे, हार तुरे, शेरनी वाटप, सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले आहे. प्रथम क्रमांकास १ लाख ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांक ५१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक ३१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

एक नंबर फायनलसाठी ५१ हजार रुपये, दोन नंबर फायनलसाठी ४१ हजार रुपये, तीन नंबर फायनलसाठी ३१ हजार रुपये, चार नंबर फायनलसाठी २१ हजार रुपये, घाटाचा राजा ११ हजार रुपये, शर्यतीमधील आकर्षक (बारी) गाडा ५५५५ रुपये, २० फुटांवरून कांड लावून प्रथम येणाऱ्या गाड्यास ५५५५ रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. रविवारी सकाळी ९ ते ४:३० ठकसेन शिंदे आणि पार्टी यांचा कलगीतुरा कार्यक्रम होणार आहे.

 

Web Title: After twenty years, a huge procession will be held in Nirgudsar once again on the occasion of the Dharmaraj Yatra festival...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.