जेजुरी: जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना भंडाऱ्याचा भडका होऊन त्यामध्ये सुमारे १६ जण प्रचंड भाजले. यामध्ये आताच निवडून आलेल्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे व त्यांचे पती राहुल घाडगे यांचा तसेच प्रभाग क्र.५मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका कु.स्वरूपा खोमणे आदींचा समावेश आहे. ही घटना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली घटनेत होरपळलेल्या -भाजलेल्या जखमींना तातडीने येथील खाजगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनीही घटना स्थळी धाव घेतली.व परिस्थितीची माहिती घेतली आहे.
याबाबतचे थोडक्यात वृत्त असे की, येथील मल्हार नाट्यगृह येथे मतमोजणी व निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार व कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उधळण केलेल्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला व स्फोटही झाला. या मध्ये सुमारे १६ जण भाजले असून यात महिलांचा समावेश आहे.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1637915204282888/}}}}
जखमींची नावे पुढील प्रमाणे
१)रुपाली खोमणे २)विलास बारभाई , ३)सानिका गाढवे , ४) संस्कार गलांगे , ५)देवल बारभाई , ६)मनीषा चव्हाण ,७)रजनी बारभाई , ८)स्वप्नील लाखे , ९)अनिल बारभाई , १०)गणेश चव्हाण ११)निशा दादा भालेराव १२)लक्ष्मी माऊली खोमणे १३) मोनिका राहुल घाडगे ( नवनिर्वाचित नगरसेविका )१४)राहुल कृष्णा घाडगे ,१५ )कु.स्वरूपा जालिंदर खोमणे (नवनिर्वाचित नगरसेविका ) १६)उमेश भंडलकर
गडाच्या पहिल्या पायरीजवळ घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून ज्वालाग्राही ,व भेसळयुक्त भंडाऱ्याने पेट घेऊन मोठा भडका उडाला. भविष्यात भेसळयुक्त भंडाऱ्याच्या विक्रीवर कडक कारवाई करण्यात येणार असून नगरपालिका याबाबत पुढील काळात कठोर पावले उचलणार आहे असे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी सांगितले.
Web Summary : Celebration after Jejuri election results turned tragic as a fire erupted near the fort, injuring sixteen. Newly elected councilors were among the injured during the Bhandara offering. Investigations are underway regarding the incident.
Web Summary : जेजुरी चुनाव परिणाम के बाद किले के पास जश्न के दौरान आग लगने से सोलह लोग घायल हो गए। भंडारा अर्पण करते समय नवनिर्वाचित पार्षद भी घायल हुए। घटना की जांच जारी है।