शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानंतर ज्या पद्धतीच्या भूमिका समोर येतायेत त्यातून पक्षात शीतयुद्ध सुरु - आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 18:07 IST

काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टोळीयुद्ध ही दिसेल, आशिष शेलारांची टीका

इंदापूर : शरद पवार यांनी राजीनामा दिला, त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाकीच्या लोकांची वाक्ये हे  राष्ट्रवादीतल वाक् युध्द होत. ते संपले व आता त्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्या पद्धतीच्या भूमिका समोर येतायत त्यातून शीतयुद्ध चालू असल्याचे दिसत आहे. आता काही दिवसांनी टोळीयुद्ध सुद्धा दिसेल, असे मत भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललेल्या घडामोडींवर टीपण्णी करताना शेलार म्हणाले की, महाराष्ट्राचे पक्षाच नेतृत्व कोणी करायचे हे त्यांनी ठरवायचे. पण सगळ्यांसमोर एकमत नाही. एकमत नसणे स्वाभाविक आहे. ते नैसर्गिक आहे की अनैसर्गिक की कोणी करत आहे ते काही काळामध्ये दिसेल. खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदा त्याच्या पक्षाची काळजी करावी. त्यांच्या पक्षामध्ये त्यांना मिळालेले नवीन स्थान, त्या स्थानाखाली सुरुंग तर नाही ना या बाबतची चिंता करावी. त्यांना दिलेल्या राज्यांतील काही राज्यांमध्ये राष्ट्रवादी आहे का हे मायक्रोस्कोप घेऊन शोधायला फिरावे. त्यानंतर भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर बोलण्याचा विचार करावा, असा सल्लाही शेलार यांनी दिला.

उद्धव ठाकरे आपने सलगी क्यू की ये कौनसा हिंदुत्व है     माहिममध्ये उध्दव ठाकरे,ॲड. प्रकाश आंबेडकर व औरंगजेबाचे फोटो असलेले बॅनर झळकल्याच्या वृत्ताविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आपण कालपासून बाहेर असल्याने आपणास याची कल्पना नाही. पण ज्या पध्दतीचे बॅनर लावल्याचे माध्यमातून दिसते आहे, त्यामध्ये औरंगजेबाशी? त्याच्या कबरीशी आपुलकी जपणाऱ्यांबरोबर उद्धव ठाकरे व त्यांचा पक्ष असल्याचे चित्र सुस्पष्टच आहे. त्याचे उत्तर ठाकरे व संबंधितांना द्यावे लागेल. शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल हिंदी भाषेचा आधार घेऊन 'उनका हिंदुत्व औरंगजेब की जो कब्र है उसकी पूजा करने वालोके साथ क्यू फसा है. भारतीय जनता पार्टीका हिंदुत्व तो रामजन्मभूमी से लेकर उज्जैन के महाकालेश्र्वर तक,केदारनाथ से काशिनाथ तक का है, ये दुनिया ने देखा है, असे म्हणत, औरंगजेब की कब्र से प्यार करनेवालोंके साथ उद्धव ठाकरे आपने सलगी क्यू की ये कौनसा हिंदुत्व है ये बताये अशी विचारणा शेलार यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेAshish Shelarआशीष शेलारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे