पुणे : प्रेयसी रिक्षावाल्याबरोबर पळून गेल्याच्या रागातून रिक्षाचालकांचे मोबाईल चोरण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने रागाच्या भरात एका प्रेमवीराने मित्राच्या मदतीने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करुन त्यांची तोडफोड केली. बिबवेवाडी पोलिसांनी दोघांनाही तातडीने अटक केली आहे. शरद तुकाराम पाटोळे (वय २०, रा़ टिळेकरनगर) आणि कुमार गोपाळ राठोड (वय १९, रा़ अण्णाभाऊ साठेनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ या दोघांनी रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशा ८ वाहनांची तोडफोड केली. हा प्रकार अण्णाभाऊ साठेनगर येथील गुलमोहोर कॉलनीत मध्यरात्री एक वाजता घडला.
प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्यानंतर प्रेमवीराने 'अशा' प्रकारे व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 12:57 IST
प्रेयसी रिक्षावाल्याबरोबर पळून गेल्याच्या रागातून रिक्षाचालकांचे मोबाईल चोरण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता..
प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्यानंतर प्रेमवीराने 'अशा' प्रकारे व्यक्त केला संताप
ठळक मुद्देदोघांना अटक : बिबवेवाडीतील घटना