शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

२0 तासांच्या प्रयत्नानंतर तिघांचे मृतदेह सापडले, नातेवाईक मुळशीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 18:17 IST

चेन्नईतील ए.सी.एस मॅट्रिक्युलेशन शाळेचे विद्यार्थी शिबिरासाठी मुळशीमधील कातरखडक या गावी जॅकलिन स्कुल आॅफ थॉट या ठिकाणी आलेले होते. आठ दिवस हे शिबीर येथे घेण्यात येणार होते.

ठळक मुद्देमुंबईतून विमानाने जाणार मृतदेह चेन्नईला१३-१५ वयोगटातील २० विद्यार्थी याठिकाणी आलेले

पौड : मुळशीत उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या चेन्नई येथील तीन शाळकरी मुलांचा धरणात पडून दुर्दैवी मृत्यू झाला असून २0 तासांच्या शोधमोहिमेनंतर तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. काल घटनेनंतर पहिला मृतदेह लगेच सापडला होता. डॅनिश राजा (वय १३), संतोष के. (वय १३), सर्वान्ना (वय १३ ) असे मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील डॅनिश राजा याचा मृतदेह बुधवारी घटनेनंतर गावकºयांनी शोधून काढला होता. दरम्यान, या विद्यार्थ्यांचे नातेवाईक चैैनईवरून आज सकाळी घटनास्थळी पोहचले आहेत. चेन्नईतील ए.सी.एस मॅट्रिक्युलेशन शाळेचे विद्यार्थी शिबिरासाठी मुळशीमधील कातरखडक या गावी जॅकलिन स्कुल आॅफ थॉट या ठिकाणी आलेले होते. आठ दिवस हे शिबीर येथे घेण्यात येणार होते. यासाठी १३-१५ वयोगटातील २० विद्यार्थी याठिकाणी आलेले होते. त्यांच्यासोबत एक शिक्षक तर तीन शिक्षिका असे चार जण सोबत आलेले आहेत. शिबिराचा बुधवारी पहिलाच दिवस होता. येथून जवळच असलेल्या कातरखडक या धरणावर सर्वजण फिरायला गेले होते. दुपारी २ वाजता यातील काही विद्यार्थी पाण्यात उतरले असता, यातील वरील तिघे विद्यार्थी बुडाले.  घटनेची माहिती समजताच गावातील मंडळी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या शोधमोहिमेत एका विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला होता.  सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरु होते. मात्र दोघांचा शोध लागला नाही. रात्री अंधार झाल्याने शोध काम थांबविण्यात आली. गुरूवारी सकाळी मुळशी प्रतिष्ठाण व आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोध मोहीम सुरू केली. यात आणखी एक मृतदेह सापडला. त्यानंतर एनडीआरफचे पथक दाखल झाले. त्यांनी तिसरा मृतदेह बाहेर काढला. काल सापडलेल्या एका विद्यार्थ्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून आता सापडलेल्या दोघांचे शवविच्छेदन पौैढ ग्रामीण रूग्णालयात करण्यात येत आहे. यानंतर ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असून मुंबईतून विमानाने चेन्नईला पाठविण्यात येणार आहे.  

टॅग्स :PuneपुणेDamधरणChennaiचेन्नईDeathमृत्यूStudentविद्यार्थी