शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

Ather Energy ची डिलरशीप मिळवण्याचा प्रयत्न अंगलटी; तरुणाला तब्बल २१ लाखांना गंडा

By विवेक भुसे | Updated: May 4, 2023 16:04 IST

आय टी कंपनीत असलेल्या तरुणाने व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतल्यावर इंटरनेटवर व्यवसायाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता

पुणे : आय टी कंपनीत असलेल्या तरुणाने व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. इंटरनेटवर व्यवसायाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यातून डिलरशीप मिळविण्याचा प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगाशी आला. इलेक्ट्रिक स्कुटरची निर्मिती करणाऱ्या एथर एनर्जीची डिलरशीप देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी त्यांना तब्बल २१ लाख ३० हजार ५०० रुपयांचा गंडा घातला.

याबाबत मगरपट्टा येथे राहणाऱ्या एका ४३ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ ते २६ एप्रिल २०२३ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आय टी कंपनीत काम करत होते. नोकरी ऐवजी स्वत:चा व्यवसाय चालू करावा, असा त्यांच्या विचार होता. त्यातून त्यांनी इंटरनेटवर काही तरी व्यवसायाची माहिती घेत होते. त्यांनी फेब्रुवारीमध्ये एथर एनर्जी च्या वेबसाईटवर डिलरशीपसाठी अर्ज भरला. त्यांना एकाने कॉल करुन कंपनीने निवड केली असून तुम्हाला ई मेल केल्याचे सांगितले. त्यांनी ईमेलवरील फॉर्म भरून दिल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी डिलरशीपसाठी पेमेंटचे शेड्युल कसे असणार याची माहिती दिली होती. त्यात रजिस्ट्रेशन फी, लायसन्स, सिक्युरिटी डिपॉझिट, स्टॉक, अॅग्रीमेंट असे सर्व मिळून ६२ लाख ७५ हजार ५०० रुपयांचे शेड्युल देण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी २६ एप्रिलपर्यंत एकूण २१ लाख ३० हजार ५०० रुपये पाठविले होते. त्यानंतर त्यांनी विमाननगर येथील एथर एनर्जी च्या स्कुटर शोरुमला भेट दिली. तेथून त्यांनी कंपनीच्या लिगल सेल्स एक्सझिक्युटीव्हशी संपर्क साधला असता, त्यांना आलेला ईमेल व त्यांनी ज्या बँक खात्यात पैसे पाठविले, ते कंपनीचे अधिकृत ईमेल व बँक खाते नसल्याचे समजले.त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक डगळे तपास करीत आहेत.

का झाली फसवणूक

* आय टी कंपनीत असतानाही आभासी संपर्कावर ठेवला विश्वास* कंपनीशी थेट संपर्क न करताच केला व्यवहार* अनेक डिलर शहरात असताना त्यांच्याशी केला नाही अगोदर संपर्क* प्रत्यक्ष कंपनीला भेट न देता, खात्री न करता पाठविले पैसे* आपल्या नावाशी साधम्य असलेल्या वेबसाईट इंटरनेटवर असल्याने लोकांशी फसवणूक होऊ शकते, याकडे कंपन्यांचे दुर्लक्ष* अशा साधम्य असलेल्या वेबसाईट हटविण्यासाठी कंपन्या घेत नाही पुढाकार

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसITमाहिती तंत्रज्ञानfraudधोकेबाजीMONEYपैसाInvestmentगुंतवणूक