Pune | खंडाळ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू; दगडी बंगला कमानीजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 14:00 IST2023-02-17T13:57:27+5:302023-02-17T14:00:02+5:30
लोणावळा (पुणे) : खंडाळा येथील आयसीआयसीआय एटीएम शेजारील दगडी बंगला कमानीजवळ अज्ञात वाहनाची धडक बसल्याने एका ४० ते ४५ ...

Pune | खंडाळ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू; दगडी बंगला कमानीजवळील घटना
लोणावळा (पुणे) : खंडाळा येथील आयसीआयसीआय एटीएम शेजारील दगडी बंगला कमानीजवळ अज्ञात वाहनाची धडक बसल्याने एका ४० ते ४५ वर्ष वयोगटातील प्रौढाचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी पोलिस शिपाई भूषण कुँवर यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अज्ञात व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहनचालकाने वाहनासह पलायन केले असून, या अज्ञात वाहनचालकाचा शोध पोलिस उपनिरीक्षक मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शकील शेख घेत आहेत.