शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

धरणातील पाणी राखून ठेवण्याची काळजी प्रशासनाने घेतली नाही: दिलीप वळसे पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 1:16 PM

पुणे जिल्हा प्रशासनाने पाणी वाटपात आपली बाजू भक्कमपणे मांडली नाही त्यामुळे आज टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, यामध्ये सर्वस्वी चुक प्रशासनाची आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने पाऊस पडेपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करणे गरजेचे

घोडेगाव : डिंभे धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याची काळजी पाटबंधारे विभाग व प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती. या वर्षी धरणातील पाणी लवकर संपल्याने पिण्याच्या पाण्याचाप्रश्न गंभीर झाला आहे. यासाठी प्रशासनाने पुढील काळात नदीमधील पाणी, विहिरींमध्ये असलेले पाणी पाऊस पडेपर्यंत पुरेल असे नियोजन करावे, अशा सूचना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या. आंबेगाव तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे नियोजन करण्यासाठी दि. ३१ रोजी पंचायत समितीच्या हुतात्मा बाबू गेनू सभागृहात दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीत टँकर आढावा, चारा छावण्या, विंधनविहिरी, नुकसानाचे पंचनामे इत्यादी विषयांवर चर्चा झाली.यावेळी प्रांत अधिकारी संजय पाटील, कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर, पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता सचिता डुंबरे, तहसीलदार सुषमा पैकेकरी, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, कृषी अधिकारी संजय विश्वासराव, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, उपसभापती नंदा सोनावले, माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, जिल्हा परिषद सदस्या रूपा जगदाळे, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे तसेच सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. पुणे जिल्हा प्रशासनाने पाणी वाटपात आपली बाजू भक्कमपणे मांडली नाही त्यामुळे आज टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, यामध्ये सर्वस्वी चुक प्रशासनाची आहे. निवडणूक आचारसंहितेमध्ये आम्ही काही बोलू शकत नव्हतो, यामध्ये प्रशासनाने सुध्दा टंचाईची काही दखल घेतली नाही अशी टीका वळसे पाटील यांनी केली.तालुक्यासाठी बोअरची नवीन गाडी येणार आहे. ही गाडी पहिली आदिवासी भागात पाठवली जावी. येथे पाऊस सुरू होण्यापुर्वी बोअर घेतल्या जाव्यात.

 घोडेगाव व मंचरला पाणी पुरवठा होणा-या बंधा-यांचे ढापे काढले जाऊ नयेत असा निर्णय मागिल बैठकीत झाला असतानाही ढापे काढले गेले आहेत. त्यामुळे या गावांना पाणी कमी पडू लागले आहे. - गाळमुक्त धरण, बंधारा हि शासनाचीच संकल्पना आहे. स्वखर्चाने शेतकरी, विटभट्टी चालवणारे कुंभार माती उचलून न्यायला तयार असतील तर महसुल विभागाने याची अडवणूक करू नये. हा गाळ उचलण्याची परवानगी दयावी.

- पाण्या अभावी झालेल्या  पिकांच्या नुकसानीचे व जनावरांचे पंचनामे कृषी, महसुल व पंचायत समिती विभागाने करून घ्यावेत.  - तहसिल कार्यालयाच्या खुप तक्रारी सतत येत असतात. येथील अधिकारी व कर्मचा-यांना रोजगार हमी योजना, टंचाई या कामांना वेळ नाही मात्र इतर कामांसाठी वेळ आहे. येथे प्रत्येक कामासाठी अडवणूक केली जात असेल तर तालुक्यासाठी हे योग्य नाही.- तळेघर व अडिवरे येथे शासन आपल्या दारीचे कॅम्प घेतले जावेत. इत्यादी विषयांवर चर्चा झाली.

टॅग्स :ambegaonआंबेगावWaterपाणीdroughtदुष्काळ