शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याच्याकडे कोट्यावधी रुपयांचे घबाड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 11:15 PM

सीबीआयच्या कारवाईत पैसे मोजण्याच्या दोन मशीनसह ३० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचा समावेश

पुणे : पुण्यात पहिल्यांदाच एका आयएएस अधिकाऱ्यावर लाचखोरी प्रकरणी सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. यात सीबीआयच्या हाती करोडो रुपयांचे घबाड लागले असल्याची माहिती समोर आली आहे. अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड असे छापा पडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्या घरातून ४ कोटी रोख रकमेसह कोट्यावधी रुपयांची मालमत्ता हाती लागल्याचे समजते. दरम्यान, रामोड याच्या विधानभवनातील कार्यालयात सीबीआयने पाच तासांची कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील भूसंपादन प्रकरणात नव्याने मोबदला देण्याच्या उद्देशाने रामोड याने लाचेची मागणी केली होती. संबंधित शेतकऱ्याने याबाबत सीबीआय कडे तक्रार केली होती. त्यानंतर रामोड याला शुक्रवारी (दि. ९ जून) ८ लाखांची लाच घेताना सीबीआयच्या पथकाने रंगेहात पकडले. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान रामोडने आतापर्यंत किती मालमत्ता जमा केली याची चौकशी करण्यासाठी, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी रामोड याच्या विधान भवन येथील कार्यालय आणि क्वीन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान व बाणेर येथील घरावर एकाच वेळी छापा मारला. रामोड हा दोन वर्षांपासून पुण्यात पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत होता. त्याच्याबाबत काही दिवसांपासून येत असलेल्या लाचखोरीच्या तक्रारींनंतर शुक्रवारी अचानक ही कारवाई करण्यात आली.

पाच तास चालली कारवाई, पुण्यातील पहिलाच आयएएस अधिकारी अडकला लाच प्रकरणात..

रामोड याच्यावर सीबीआयने लाचप्रकरणी दुपारी साडेबाराच्या सुमारास धाड टाकली. तब्बल पाच तास ही कारवाई सुरू होती. या कारवाईनंतर अनेक अधिकारी- कर्मचारी अवाक झाले. पुणे विभागात पहिल्यांदाच आयएएस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याने प्रकरण गंभीर असल्याची चर्चा सर्वत्र होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रामोड याला ताब्यात घेतले.

सोलापूरमधील प्रकरण..

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भूसंपादनाचा मोबदला संबंधित शेतकऱ्याला मान्य नव्हता. या प्रकरणात न्यायनिवाडा करण्यासाठी राज्य सरकारने लवाद म्हणून रामोड याची नियुक्ती केली होती. त्यानुसार रामोड यांच्याकडे याप्रकरणी सुनावणी सुरु होती. भूसंपादन मोबदल्याचे अपिल मान्य करण्यासाठी तक्रारदाराकडे ८ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. याप्रकरणी तक्रारदाराच्या वकिलांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती.

पंधरा दिवस सुरू होती तयारी..

या तक्रारीनुसार सीबीआयकडून गेल्या १५ दिवसांपासून माहिती गोळा करण्याचे काम सुरु होते. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर सीबीआयने शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास विधानभवन येथील अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात रामोड याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. सीबीआयची कारवाई झाल्याचे कळताच रामोड याने चक्कर आल्याचा बनाव केला. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनीच रामोड याला पाणी दिले. त्यानंतर या प्रकरणाची त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. ही चौकशी तब्बल पाच तास सुरु होती. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

कोट्यवधींची माया..

रामोड याच्याकडे संपूर्ण विभागाच्या भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत सुनावणी सुरू होत्या. केवळ एका प्रकरणात आठ लाखांची लाच स्वीकारताना त्याला पकडण्यात आले. गेल्या दोन वर्षांचा हिशोब केल्यास त्याने कोट्यवधींची माया गोळा केल्याची चर्चा या वेळी विभागीय आयुक्तालय परिसरात होती.दरम्यान अनिल रामोड याच्यावर पडलेल्या सीबीआयच्या छाप्यानंतर त्याच्याकडे असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीची देखील जोरात चर्चा होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामोड याच्याकडे ४ कोटी रोख, डेक्कन येथे एक हॉटेल आणि फ्लॅट, बाणेर येथे एक फ्लॅट, छत्रपती संभाजीनगर येथे फ्लॅट आणि जमीन तसेच नांदेड या त्याच्या मूळ गावी देखील जमीन असून त्याची किंमत १५ कोटी रुपयांच्याही पुढे असल्याचे सांगितले. सीबीआयच्या छापेमारी झाल्यानंतर, राज्य सरकार रामोड याच्यावर काही कारवाई करणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

खरचं सीबीआयचे अधिकारी आहेत का ? पोलिसांची खातरजमा..

बाणेर येथील ‘ऋतुपर्ण’ सोसायटीत अनेक उच्चपदस्थ अधिकारी राहतात. विशेषत: राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांचे निवासस्थान या सोसायटीत आहे. परिणामी, या सोसायटीत नेहमीच व्हीआयपी लोकांचा नेहमीच वावर असतो. शुक्रवारी दुपारी अचानक काही चारचाकी वाहनांमधून ‘सीबीआय’चे अधिकारी दाखल झाले. त्यांनी सोसायटीच्या कोणत्याच यंत्रणेला न जुमानता रामोड याच्या घराचा ताबा घेतला. अचानक पडलेल्या या धाडीमुळे सोसायटीच्या सुरक्षारक्षकांसह मॅनेजरचीही चांगलीच भंबेरी उडाली. सीबीआयच्या छाप्याची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीसही अॅक्शन मोडमध्ये येत, त्यांनी रामोड याच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. सोसायटीत दाखल झाल्यावर पोलिसांनी मॅनेजरसोबत त्यांनी चर्चा केली. अधिकाऱ्यांनी सोसायटीची परवानगी घेतली का ? ते खरोखरच सीबीआयचेच अधिकारी आहेत का ? असे प्रश्न पोलिसांकडून सोसायटीच्या मॅनेजरला विचारण्यात आले. यानंतर मॅनेजरने सीबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत पोलिसांचा संवाद करवून दिला. यानंतर पोलिसांना हे सीबीआयचे च पथक असल्याची खात्री झाल्यावर पोलिस तेथून माघारी परतले.

टॅग्स :PuneपुणेCBIगुन्हा अन्वेषण विभागMONEYपैसाPoliceपोलिसcommissionerआयुक्त