Adar Poonawala gave important information about the fire at the building of Serum Institute | सीरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला भीषण आग, अदर पूनावाला यांनी दिली नुकसानीबाबत महत्त्वाची माहिती

सीरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला भीषण आग, अदर पूनावाला यांनी दिली नुकसानीबाबत महत्त्वाची माहिती

ठळक मुद्देसीरम इन्स्टिट्युटमधील एका इमारतीला लागलेल्या आगीनंतर तुम्ही व्यक्त केलेली चिंता आणि प्रार्थनांसाठी तुम्हा सर्वांचे आभारसर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीसीरम इन्स्टिट्युटच्या या इमारतीचे काही मजले या आगीत नष्ट झाले आहेत

पुणे - कोविशिल्ड लसीच्या उत्पादनामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटच्या पुण्यातील प्रकल्पामधील एका इमारतीला आज दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी ट्वीट करत आगीमध्ये झालेल्या नुकसानाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये अदर पूनावाला म्हणाले की, सीरम इन्स्टिट्युटमधील एका इमारतीला लागलेल्या आगीनंतर तुम्ही व्यक्त केलेली चिंता आणि प्रार्थनांसाठी तुम्हा सर्वांचे आभार. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तसेच कुणालाही गंभीर दुखापतही झालेली नाही. मात्र सीरम इन्स्टिट्युटच्या या इमारतीचे काही मजले या आगीत नष्ट झाले आहेत.सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये दुपारी २ च्या सुमारास आग लागली होती. मांजरी भागात असलेल्या कोरोना लसीचं संशोधन आणि उत्पादनाचा विभाग या ठिकाणी नसल्याचं चिंतेची बाब नसल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं. आग लागलेल्या भागात काही कर्मचारी अडकले होते. त्यापैकी तिघांची सुटका करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असा सिरम इन्स्टिट्यूटचा नावलौकिक आहे. काही दिवसांपूर्वीच सीरमने कोरोना प्रतिबंधक असलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. कोविशील्डच्या लसीकरणाची मोहीम देशात सुरू आहे. तसेच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लस उत्पादन करण्यासाठी सीरम कंपनी प्रयत्नशील आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Adar Poonawala gave important information about the fire at the building of Serum Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.