पुणे : राज्यात २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. पुण्यातही १२ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायत मिळून आतापर्यंत ८.३७ टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी संथ गतीने मतदान सुरु आहे. तर काही भागात चांगलाच प्रतिसाद दिसून येत आहे. अशातच भोरमध्ये पुन्हा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
भोरमधे मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करत ईव्हीएम मशीनची पूजा आणि आरती केल्याचे समोर आले होते. आता भोरमध्ये आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे दिसून आले आहे. मतदान केंद्राबाहेर आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे दिसते आहे. शंकर मांडेकर यांचे मुळशीतील कार्यकर्ते तर संग्राम थोपटे यांचे भोरमधील कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. मतदान केंद्राबाहेरच दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. पोलिसांनी मध्यस्थी करताच वातावरण शांत झाले आहे.
भोरमध्येही सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासुन संथ गतीने मतदान सुरु आहे. सकाळच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएम मशीनची पूजा आणि आरती करण्यात आली होती. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घटनेने केंद्रप्रमुख बदलण्यात आले. आता पुन्हा आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. मांडेकर आणि थोपटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर वातावरण शांत झाल्याचे दिसते आहे.
Web Summary : Tension flared in Bhor as supporters of incumbent and former MLAs clashed outside a polling booth during municipal elections. The incident follows earlier reports of EVM worship. Police intervened to restore order; voting continues at a slow pace.
Web Summary : भोर में नगरपालिका चुनावों के दौरान मौजूदा और पूर्व विधायकों के समर्थकों के बीच मतदान केंद्र के बाहर झड़प हो गई। इससे पहले ईवीएम पूजा की खबरें आई थीं। पुलिस ने हस्तक्षेप कर शांति बहाल की; मतदान धीमी गति से जारी है।