शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
2
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
3
अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?
4
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
5
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
6
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
7
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
8
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
9
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
10
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?
11
ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती
12
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
13
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
14
गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ!
15
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
16
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
17
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
18
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
19
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
20
"ऐकून खरंच खूप दुःख होतं की...", पुण्यात होणाऱ्या मतदानाआधी प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत

बस, व्हॅनमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ५० वाहनांवर कारवाई बडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 7:01 PM

शहरामध्ये रिक्षा, व्हॅन व बसला विद्यार्थी वाहतुक करण्यासाठी परवाना दिला जातो...

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य शासनाने काही वर्षांपुर्वी नियमावली तयार आरटीओकडून जुलै महिन्यात अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणीएकुण ९० वाहनांवर करण्यात आलेल्या कारवाईत २१ लाख ४६ लाख ६१८ रुपयांचा कर व दंड वसुल

 पुणे : विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसतानाही बस, व्हॅनमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहुतक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा २ वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई केली आहे. तसेच विद्यार्थी वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर ५० वाहनांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य शासनाने काही वर्षांपुर्वी नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसारच विद्यार्थी वाहतुक करणे बंधनकारक आहे. शहरामध्ये रिक्षा, व्हॅन व बसला विद्यार्थी वाहतुक करण्यासाठी परवाना दिला जातो. व्हॅन व बससाठी रंग निश्चित करून देण्यात आला आहे. दोन्ही वाहने संपुर्ण पिवळ्या रंगात असावीत, तर मध्ये विटकरी रंगाचा पट्टा असणे आवश्यक आहे. त्याशिवाय आरटीओकडून विद्यार्थी वाहतुकीचा परवाना दिला जात नाही. मात्र, हा परवाना न घेता काही व्हॅन व बस अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतुक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.आरटीओकडून जुलै महिन्यात अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम राबविली. यामध्ये हा प्रकार समोर आला आहे. विनापरवाना वाहतुक करणाऱ्या एकुण ४२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी २० वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. तर कर, प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र नसणे, चालकाकडे बॅच नसणे, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक करणे, वाहनांच्या आसनक्षमतेते बदल करणे, वाहन चालन परवाना नसलेल्या ५० वाहनांवरही कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकुण ९० वाहनांवर करण्यात आलेल्या कारवाईत २१ लाख ४६ लाख ६१८ रुपयांचा कर व दंड वसुल करण्यात आल्याची माहिती आरटीओ कार्यालयातून देण्यात आली. -----------------विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी आरटीओकडे द्यावी. वाहन क्रमांक दिला तरी त्याआधारे संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात येईल. तसेच पालकांनीही वाहनांना विद्यार्थी वाहतुकीचा परवाना आहे किंवा नाही, याबाबतची माहिती घ्यावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पालकांनीही लक्ष देण्याची गरज आहे.- विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसSchoolशाळाStudentविद्यार्थी