बस, व्हॅनमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ५० वाहनांवर कारवाई बडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 07:01 PM2019-08-01T19:01:54+5:302019-08-01T19:19:56+5:30

शहरामध्ये रिक्षा, व्हॅन व बसला विद्यार्थी वाहतुक करण्यासाठी परवाना दिला जातो...

The action will be taken against bus, van who transport students unsafely | बस, व्हॅनमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ५० वाहनांवर कारवाई बडगा

बस, व्हॅनमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ५० वाहनांवर कारवाई बडगा

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य शासनाने काही वर्षांपुर्वी नियमावली तयार आरटीओकडून जुलै महिन्यात अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणीएकुण ९० वाहनांवर करण्यात आलेल्या कारवाईत २१ लाख ४६ लाख ६१८ रुपयांचा कर व दंड वसुल

 पुणे : विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसतानाही बस, व्हॅनमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहुतक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा २ वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई केली आहे. तसेच विद्यार्थी वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर ५० वाहनांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य शासनाने काही वर्षांपुर्वी नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसारच विद्यार्थी वाहतुक करणे बंधनकारक आहे. शहरामध्ये रिक्षा, व्हॅन व बसला विद्यार्थी वाहतुक करण्यासाठी परवाना दिला जातो. व्हॅन व बससाठी रंग निश्चित करून देण्यात आला आहे. दोन्ही वाहने संपुर्ण पिवळ्या रंगात असावीत, तर मध्ये विटकरी रंगाचा पट्टा असणे आवश्यक आहे. त्याशिवाय आरटीओकडून विद्यार्थी वाहतुकीचा परवाना दिला जात नाही. मात्र, हा परवाना न घेता काही व्हॅन व बस अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतुक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
आरटीओकडून जुलै महिन्यात अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम राबविली. यामध्ये हा प्रकार समोर आला आहे. विनापरवाना वाहतुक करणाऱ्या एकुण ४२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी २० वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. तर कर, प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र नसणे, चालकाकडे बॅच नसणे, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक करणे, वाहनांच्या आसनक्षमतेते बदल करणे, वाहन चालन परवाना नसलेल्या ५० वाहनांवरही कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकुण ९० वाहनांवर करण्यात आलेल्या कारवाईत २१ लाख ४६ लाख ६१८ रुपयांचा कर व दंड वसुल करण्यात आल्याची माहिती आरटीओ कार्यालयातून देण्यात आली. 
-----------------
विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी आरटीओकडे द्यावी. वाहन क्रमांक दिला तरी त्याआधारे संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात येईल. तसेच पालकांनीही वाहनांना विद्यार्थी वाहतुकीचा परवाना आहे किंवा नाही, याबाबतची माहिती घ्यावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पालकांनीही लक्ष देण्याची गरज आहे.
- विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: The action will be taken against bus, van who transport students unsafely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.