शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

बोगस ठेकेदारांवर कारवाई करणार

By admin | Updated: June 13, 2015 22:35 IST

पुणे व कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागात सन २००४ ते २०१५ या कालावधीत नोंदणी झालेल्या ठेकेदारांची सर्व माहिती घेऊन

इंदापूर : पुणे व कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागात सन २००४ ते २०१५ या कालावधीत नोंदणी झालेल्या ठेकेदारांची सर्व माहिती घेऊन, खोटी कागदपत्रे जोडून बोगस ठेकेदारांची नोंदणी प्रमाणपत्र बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व बोगस ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे, अशी माहिती रिपाइंचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मखरे यांनी दिली.पुणे आणि कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागात उपरोक्त कालावधीत खोट्या कागदपत्रांच्या आधारे, ठेकेदारांची बोगस नोंदणी प्रमाणपत्र तयार करण्यात आली. त्या आधारे सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी व बोगस ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची कामे करुन तसेच कामे न करता कोट्यवधी रुपयांची कमाई केली, असा रिपाइंचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मखरे यांचा आरोप आहे. याबाबतची कागदपत्रे जमा करुन त्यांनी बोगसगिरी उघड करण्यासाठी तीन वर्षांपासून तक्रार करण्याची मोहिम उघडली आहे. या संदर्भात 'लोकमत'ने मध्यंतरी वृत्तही प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर मखरे यांनी बुधवारी (दि. १० जून) मंत्रालयात जाऊन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. आपण केलेल्या तक्रारीसंदर्भात त्यांना सविस्तर माहिती दिली. कागदपत्रे सादर केली.त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. सन २००४ ते २०१५ या कालावधीतील ठेकेदारांची सर्व माहिती घेऊन, बोगस ठेकेदार व नोंदणीचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसे आदेशही त्यांनी संबंधितांना दिले, अशी माहिती मखरे यांनी दिली. (वार्ताहर)