बारामतीत गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई; २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 12:23 PM2024-03-13T12:23:21+5:302024-03-13T12:28:29+5:30

पहाटेच्या सुमारास निरावागज ते मळद गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने आरोपी मदने हा गुटखा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती

Action taken against two vehicles transporting gutka in Baramati 26 lakh worth of goods seized | बारामतीत गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई; २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बारामतीत गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई; २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सांगवी : बारामती तालुक्यातील नीरावागज -मळद रोडवर प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला छापा टाकून वाहनांसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात मोठे यश आले आहॆ. मंगळवार (दि.१२) रोजी पहाटे पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वैभव भगवान साळवे, पोलीस हवालदार नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती यांनी आरोपी गणेश दत्तात्रेय मदने, (वय ३०) रा. मळद (ता.बारामती ,जि.पुणे) याच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा नियम २०११ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहॆ. 

मंगळवार (दि. १२) रोजी सकाळी पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास निरावागज ते मळद गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने आरोपी मदने हा गुटखा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांना मिळाली होती. त्यानुसार राठोड यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान  ४ लाख ८७ हजार ५०० रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची पोती प्रत्येक पोत्यात ६० पिवळसर रंगाचे गुलाम गुटख्याचे पुडे,९८ हजार रुपये किमतीची १४ फिकट हिरव्या रंगाची पोती प्रत्येक पोत्यात ५० पांढऱ्या  रंगाचे सितार गुटख्याचे पुडे, व ५ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची टाटा महीन्द्रा कंपनीची गाडी (एम.एच. ४२बीएच २२५८) मिळून आली. तर दुसऱ्या वाहनात १० लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीची १०६ पांढऱ्या रंगाची पोती प्रत्येक पोत्यात ६० पिवळसर रंगाचे गुलाम गुटख्याचे पुडे, ५ लाख रुपये किमतीची एक फिकट पिवळ्या रंगाची अशोक लेलंट कंपनीचे वाहन (एमएच ४२क्यू.बी ८८७२) मिळून आले.

अन्न सुरक्षा आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक अधिसूचनांच्या आदेशाचे उल्लंघन करुन आरोपीने १६ लाखांचा गुटखा व वाहने असे एकुण २६ लाख १९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करताना मिळून आला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे,पोलीस हवालदार वैभव साळवे,आप्पाजी दराडे, दत्ता गवळी, राहुल लाळगे यांनी ही कारवाई केली.  पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Action taken against two vehicles transporting gutka in Baramati 26 lakh worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.