शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

पुण्यात मास्क न वापरणाऱ्या ६९९ जणांवर कारवाई; न्यायालयाने अनेकांना ठोठावला १ हजार रुपये दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 13:01 IST

पुणे शहर हे रेड झोन जाहीर करण्यात आले असल्याने शहरातील सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक

ठळक मुद्देकोणत्याही भागात तुम्ही रहात असाल तरी मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन मॉर्निंग वॉक करणाऱ्या ७७८ जणांवर गुन्हे लॉकडाऊनच्या काळात विनाकारण वाहनांवरुन फिरणाऱ्या तब्बल ३३ हजार ३६१ जणांवर कारवाई

पुणे : पुणे शहर हे रेड झोन जाहीर करण्यात आले असल्याने शहरातील सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. घरातून बाहेर पडताना मास्क न वापरल्यास त्यांच्यावर १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत तब्बल ६९९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील मध्य भागात कोरोना बाधितांची संख्या अधिक असल्याने पोलिसांनी ६ एप्रिलपासून अती संक्रमित क्षेत्र म्हणून हा परिसर जाहीर केला व तेथे कर्फ्यु जाहीर केला होता. या भागात घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक केले होते. त्यानंतर संपूर्ण शहरात कर्फ्यु जाहीर केला आहे. त्यामुळे आता शहरातील कोणत्याही भागात तुम्ही रहात असाल तरी मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे पोलिसांनी वारंवार आवाहन केले तरीही अनेक जण विनाकारण मास्क न घातला घराबाहेर पडत आहे. अशांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. रविवारपर्यंत अशा ६९९ जणांवर मास्क न वापरल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे. त्यातील काही जणांवर तातडीने दोषारोप पत्र तयार करुन त्यांना न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्यांना १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे यापुढे या लोकांना पासपोर्ट, चारित्र्य पडताळणीमध्ये अडचणी येणार आहेत. पोलिसांनी १९ एप्रिलपर्यंत ३७९ जणांवर मास्क न वापरल्याबद्दल कारवाई केली होती. त्यानंतर गेल्या तीन चार दिवसात दररोज सरासरी ४० ते ४५ जणांवर कारवाई करण्यात येत आहे.शनिवारी दिवसभरात मास्क न वापरणाऱ्या ३७ जणांवर कारवाई करण्यात आली होती. २४ एप्रिल रोजी ४०, २२ एप्रिल रोजी ४७ जणांवर कारवाई करण्यात आली होती. यापुढील काळात जोपर्यंत लॉकडाऊन आहे, तोपर्यंत ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे. 

३३ हजार ३६१ वाहने जप्तलॉकडाऊनच्या काळात विनाकारण वाहनांवरुन फिरणाऱ्या तब्बल ३३ हजार ३६१ जणांवर कारवाई केली करुन ही वाहने जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत १८८ कलमान्वये १३ हजार ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मॉर्निंग वॉक करणाऱ्या ७७८ जणांवर गुन्हे शहरात फिरायला जाण्यास बंदी असताना अनेक जण जाणीवपूर्वक सकाळी सायंकाळी फिरायला बाहेर पडतात. पोलिसांनी सुरुवातीला त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांना भर रस्त्यावर उठाबश्या काढायला लावल्या. तरीही फिरायला जाणाऱ्यांची संख्या कमी होईना, तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ७७८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सीआरपीसीनुसार ३४ हजार ७४३ जणांवर संचारबंदीचा भंग केल्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 

शहर पोलिसांना या काळात मदत करण्यासाठी शहरातील विविध सोसायट्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी अशा महत्वाच्या व्यक्तींची विशेष पोलीस अधिकारी म्हणून १ हजार ६४६ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोसायटीतील लोकांना घराबाहेर पडू नये़ तसेच त्यांना लागणारा किराणा सामान, दुध व अन्य जीवनावश्यक वस्तू या सोसायटीमध्ये कशा उपलब्ध  करुन देता येईल, हे पाहण्याची प्रामुख्याने जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ़़़़़़़लॉकडाऊन काळात पोलिसांनी केलेली कारवाई१८८ नुसार दाखल केलेले गुन्हे    १३०५०वाहने जप्त                                 ३३३६१सीआरपीसीनुसार नोटीसा           ३४७४३मॉर्गिन वॉक कारवाई                   ७७८मास्क न वापरणे                         ६९९

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस