मे महिन्यामध्ये ४ हज़ार ३४७ 'फुकट्या' रेल्वे प्रवाशांवर कारवाई, १७ लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 20:09 IST2021-06-04T20:08:45+5:302021-06-04T20:09:12+5:30
मे महिन्यात लॉकडाऊन असताना शिवाय अनेक गाड्या रद्द असताना देखील बरेच जण विना तिकीट प्रवास करताना मोठ्या प्रमाणात आढळून

मे महिन्यामध्ये ४ हज़ार ३४७ 'फुकट्या' रेल्वे प्रवाशांवर कारवाई, १७ लाखांचा दंड वसूल
पुणे : पुणेरेल्वे स्थानक व विभागात मे महिन्यात विना तिकीट प्रवास करताना जवळपास ४ हजार ३४७ प्रवासी आढळून आले.त्याच्यावर कारवाई करून जवळपास १७ लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मे महिन्यात लॉकडाऊन असताना शिवाय अनेक गाड्या रद्द असताना देखील अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करताना मोठ्या प्रमाणात आढळून आले.वाणिज्य विभागाने रेल्वे स्थानक व गाडीत विशेष मोहीम राबवून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच अनियमित तिकीट काढून प्रवास करणे व क्षमते पेक्षा जास्त सामान घेऊन प्रवास करणाऱ्या ४१ प्रवाशांवर कारवाई करून १२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा,अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सहर्ष वाजपेयी व वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनिल मिश्रा यांच्या आदेशानुसार करण्यात आली.