कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल, दुकानावरील अतिक्रणावर कारवाई

By राजू हिंगे | Updated: December 31, 2023 16:33 IST2023-12-31T16:33:39+5:302023-12-31T16:33:52+5:30

कारवाईत पालिकेचे दोन जेसीबी २ जेसीबी, ३ अतिक्रमन वाहने, पोलीस तसेच महाराष्ट्र सुरक्ष मंडळाच्या सुरक्षा रक्षकांचा समावेश

Action on encroachment on hotels shops in Koregaon Park area | कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल, दुकानावरील अतिक्रणावर कारवाई

कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल, दुकानावरील अतिक्रणावर कारवाई

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कोरेगाव पार्क येथील हाॅटेल आणि दुकान व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. यावेळी गल्ली क्रमांक ६ व ७ मधील व्यावसायिकांनी केलेले फ्रंट मार्जिन, साइड मार्जीन मधील अनधिकृत स्टॉल, पक्के शेडवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ७ हजार ३०० चौरस फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

पुणे महापालिकेने गेल्या काही दिवसापासुन अनाधिकृत बांधकामावरील कारवाईचा वेग वाढविला आहे. ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाचा अतिक्रमण विभाग, पालिकेच्या आकाश चिन्ह आणि बांधकाम विकास विभाग झोन नंबर ४ यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी पालिकेचे दोन जेसीबी २ जेसीबी, ३ अतिक्रमन वाहने, पोलीस तसेच महाराष्ट्र सुरक्ष मंडळाच्या सुरक्षा रक्षकांचा समावेश होता. 

 

Read in English

Web Title: Action on encroachment on hotels shops in Koregaon Park area