शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
3
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
4
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
5
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
6
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
7
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
8
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
9
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
10
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
11
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
12
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
13
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
14
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
15
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
16
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
17
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

Corona virus : राज्य सरकारच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई : डॉ. दीपक म्हेैसेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 17:56 IST

पुण्यातील दहाही कोरोनाग्रस्त रुग्णांची स्थिती नियंत्रणात

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची पत्रकार परिषदकोरोनाच्या रुग्ण संख्येत शनिवारी वाढ झालेली नाही.सॅनिटायझर आणि मास्कची साठवणूक केल्याप्रकरणी 21 गुन्हे दाखल 

पुणे : कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने महाविद्यालये, शाळा, व्यायामशाळा, जलतरणतलाव, सिनेमागृह, नाट्यगृहे याबाबतीत दिलेले आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. त्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्यास ६ महिन्यांची शिक्षा देखील होण्याची शक्यता आहे , अशी माहिती पुणे जिल्हा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या  परिषदेला जिल्हाधिकारी नवल किशोर राम,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद, निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारिया उपस्थित होते. म्हैसेकर म्हणाले, पुण्यातील दहाही कोरोनाग्रस्त रुग्णांची स्थिती नियंत्रणात आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून योग्य ती काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत शनिवारी वाढ झालेली नाही.

शुक्रवारी मध्यरात्री एअर इंडिया आणि स्पाइस जेट मिळून ११२ प्रवासी पुण्यात आले. यातले एकही प्रवासी 7 कोरोना बाधित देशात गेलेले नाहीत याची खात्री केली. एका व्यक्तीने स्वत:ला लक्षणे असल्याचे सांगितले. त्यानुसार विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.     विद्यार्थी कोरोना झोनमध्ये गेले असतील तर त्याला परीक्षेला येण्याचे बंधनकारक करू नये. त्याची अनुपस्थिती ग्राह्य धरून परीक्षेपासून वंचित ठेवू नये. तसेच आजारी किंवा कोरोनाग्रस्त भागातून विद्यार्थ्यांना बोलवू नये, बंधन घालू नये.मास्क आणि सॅनिटायझर इसेनशिअल कमोडिटी कायद्याखाली आणले आहेत.

...............................

सॅनिटायझर आणि मास्कची साठवणूक केल्याप्रकरणी 21 गुन्हे दाखल 

अवाजवी, बनावट, दर्जाहीन वैद्यकीय साहित्याची विक्री होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या अंतर्गत पुणे शहरात सॅनिटायझर आणि मास्कची साठवणूक केल्याप्रकरणी 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

.................

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, ओशो आश्रमात अनेक विदेशी नागरिक असतात. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आला.तिथेही त्यांनाही विदेशातून आलेल्या व्यक्तींना आश्रमात विलगीकरणाच्या सूचना दिल्या आहेत.लग्न किंवा आदी प्रसंगी आवाहन आहे की, एकमेकांना साथीच्या रोगाचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी. सोहळे लहान प्रमाणात करावेत. सामूहिक विवाह, धार्मिक कार्यक्रम, लग्न व इतर कार्यक्रम पुढे सोहळे पुढे ढकलावेत. हे सर्व नियमात नसले तरी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत यापुढे बंधने घातली जाऊ शकतात. परीक्षा घेताना एक बेंच /बाक सोडून विद्यार्थ्यांना बसविण्या संदर्भातल्या सूचना सर्व विद्यापीठांना देण्यात आल्या असून त्यालाही त्यांनी मान्यता दिली आहे. 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर रामCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यcollectorजिल्हाधिकारीSchoolशाळाcollegeमहाविद्यालय