शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

बेकायदेशीरपणे जाहिरातबाजी करणाऱ्या मोबाईल कंपन्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 6:18 PM

महापालिकेच्या जाहिरात धोरण २००३ नुसार शहरामध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यापूर्वी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे१५२ ठिकाणी विनापरवानगा जाहिरातीमहापालिकेकडून केवळ नोटिसाच; दंड वसुलीकडे दुर्लक्ष २२२ रुपये प्रति चौरस फुट शुल्क जंगली महाराज रस्ता, नवी पेठ, कोरेगाव पार्क परिसरात नियमांचे उल्लंघन

पुणे : शहरामध्ये अनधिकृतपण व महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवत मोबाईल दुकानांच्या बाहेर सर्रास जाहिरातबाजी सुरु आहे. मोबाईल कंपन्यांनी शहरामध्ये १५२ ठिकाणी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे जाहिराती केल्या आहेत. संबंधित कंपनीला महापालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत, परंतु तीन पट दंड वसुल करण्याकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या जाहिरात धोरण २००३ नुसार शहरामध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यापूर्वी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. २२२ रुपये प्रति चौरस फुट शुल्क आहे.  याशिवाय शहरातील सर्वच दुकानदारांना आपल्या व्यवसायाची जाहिरात करता यावी, यासाठी दुकानाच्या दर्शनी भागाच्या लांबीएवढी व ३ फूट उंचीची जाहीरात लावण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु प्रत्येक गोष्टींची महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.  सध्या शहरात विविध भागात विविध मोबाईल कंपन्यांच्या दुकानांच्या बाहेर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवत मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जात आहे. जंगली महाराज रस्ता, कॅम्प परिसर, नवी पेठ, कोरेगाव पार्क परिसरातील सर्वच मोबाईल दुकानांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे.याबाबत महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने सर्व मोबाईल दुकानदारांना नोाटिसा देऊन नियमानुसार जाहिरात शुल्क भरण्याचे आदेश दिले आहेत. परंतु महापालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवत मोबाईल दुकानदारांनी दुर्लक्ष केले. यात प्रशासनाने गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्यानंतर अखेर मोबाईल कंपन्यांनी दुकानाबाहेर जाहीरात करण्यासाठी परवानगी घेण्यास सुरुवात केली.महापालिकेच्या वतीने शहरामध्ये मोबाईल कंपन्यांकडून करण्यात येणा-या जाहिरातींचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये ओपो कंपनीने ११७ ठिकाणी तर विवो कंपनीने २३५ ठिकाणी जाहिरात फलक  लावले आहेत.  यामध्ये काही ठिकाणी परवानगी घेऊन नियमानुसार जाहीरात शुल्क भरले देखील.परंतु आजही अनेक ठिकाणी विनापरवानगी जाहीरातबाजी सुरु आहे. यामध्ये विवो कंपनीचे शहरात ६८ ठिकाणी तर ओपोचे ८४ ठिकाणी अशा प्रकारे विनापरवानगी जाहीराती लावण्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नामध्ये ही माहिती समोर आली. 

टॅग्स :PuneपुणेAdvertisingजाहिरातPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका