विना परवाना सिक्युरिटी एजन्सी चालविणाऱ्यांवर कारवाई होणार : डॉ. के. व्यंकटेशम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 05:56 PM2019-08-12T17:56:44+5:302019-08-12T17:57:22+5:30

सुरक्षा रक्षकाला योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास ५ दिवसात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळेल..

Action to be taken on non-licensed security agency: Dr. K. venkatesham | विना परवाना सिक्युरिटी एजन्सी चालविणाऱ्यांवर कारवाई होणार : डॉ. के. व्यंकटेशम

विना परवाना सिक्युरिटी एजन्सी चालविणाऱ्यांवर कारवाई होणार : डॉ. के. व्यंकटेशम

Next

पुणे : जे विनापरवाना सिक्युरिटी एजन्सी चालवतात अशा चालक व मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच सिक्युरिटी एजन्सीच्या परवान्याकरिता पैशाची  मागणी होत असल्यास माहिती द्यावी, त्यावर कठोर कारवाई केली जाईल. दि. १५ ऑगस्टनंतर सुरक्षा रक्षकाला योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास ५ दिवसात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळेल, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के.वेंकटेशम यांनी दिली. 
    पुणे पोलीस व खाजगी सुरक्षा रक्षक संस्था यांचे वतीने पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ चा कार्यक्रम पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये साजरा करण्यात आला. त्यावेळी सुरक्षा रक्षक मालकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. यावेळी पोलीस सह आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त गुन्हे बच्चन सिंग , अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. संजय शिंदे , तसेच भारत शिल्ड फोर्सचे संस्थापक सचिन मोरे व महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक  सेवा पुरवठादार संस्थेचे मालक आणि चालक कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते.
    डॉ. व्यंकटेशम म्हणाले, भविष्यकाळात पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ या उपक्रमाच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणावर पुणे सुरक्षित करण्यावर भर दिला जाईल आणि  शहरातील कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याकरीता नागरिकांची जागरुकता आणि सहकार्याची अपेक्षा त्यावर त्यांनी भर दिला तसेच सर्व कामकाज गतिमान करण्यासाठी ऑनलाईन सुविधा असणार आहे. शहरात कोठेही काहीही झाल्यास १०० नंबर प्रमाणेच ८७७५२८३१०० व्हॉटअँप नंबर वर माहिती देण्याचे आवाहन केले आहे
    अशोक मोराळे  म्हणाले, खाजगी सुरक्षा रक्षक हे गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, मॉल, हॉटेल अँड रेस्टोरंट-पब, सर्व प्रकारची दुकाने, आय टी कंपनी, खाजगी बंगले, बँक- ए. टी. एम, सर्व प्रकारची ऑफिस, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, उद्याने, सार्वजनिक पे अँड पार्क पार्किंग, कॉमेर्सिअल कॉम्प्लेक्स, ज्वेलरी शॉप, बिग बाजार, डी मार्ट, सिनेमा गृह, शासकीय निमशासकीय संस्था, सरकारी कार्यालय, कारखाने, औद्योगिक वसाहत, विविध बाजारपेठ इ. ठिकाणी काम करतात त्यांनी पोलिसांचे खासदूत म्हणून काम केल्यास मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांवर आळा बसू शकतो आणि जे गुन्हे घडले त्यांच्या तपासाला चालना मिळू शकते. पोलीस स्टेशन आणि सुरक्षा रक्षक यांचे  १२० व्हाट्स अप ग्रुप तयार करून संपूर्ण शहरात २१ हजाराहून खाजगी रक्षक जोडण्यात आले आहेत.
    पुणे गुन्हे शाखेच्या वतीने आभारप्रदर्शन करण्यात आले. पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Action to be taken on non-licensed security agency: Dr. K. venkatesham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.