शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह २५ टिकटॉक व्हिडिओ, १५ फेसबुक पेजवर पोलिसांची कारवाई : संदीप पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 13:51 IST

कोरेगाव भीमा विजयस्तंभ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

 

पुणे : दोन वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. यामध्ये सोशल मीडियावर खास लक्ष ठेवले आहे. यात आतापर्यंत आक्षेपार्ह २५ टिकटॉक व्हिडिओ व १५ फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याशिवाय काही व्हॉट्सअ‍ॅप गु्रपच्या अ‍ॅडमिनला देखील नोटिसा दिल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी येथे दिली.जिल्ह्यात येत्या १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीची माहिती देण्यासाठी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी पाटील यांनी वरील माहिती दिली. यंदा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिक येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचबरोबर या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह, प्रक्षोभक लिखाण करणाºयांवर पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय कोरेगाव भीमा परिसरामध्ये कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भांतील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. तसेच कार्यक्रमाच्या दिवशी आयोजित केलेल्या सभामध्ये होणाºया भाषणांवर देखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट  केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये एनआरसी कायद्याविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :PuneपुणेTik Tok Appटिक-टॉकBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारFacebookफेसबुकPoliceपोलिस