शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

१० वर्षांपासून ओळख; फोनवरून रचला कट, पतीचा वर्मी घाव घालून खून, अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:47 IST

दहा वर्षांपासून गोरख काळभोर आणि शोभा काळभोर यांच्यामध्ये अनैतिक संबंध असून याच कारणावरून पती पत्नीसारखे भांडण देखील होत असे

पुणे: पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अंगणात झोपलेल्या रवींद्र काशिनाथ काळभोर (वय ४५) या व्यक्तीचा डोक्यात दगडाने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली होती. अवघ्या तीन तासात लोणी काळभोरपोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. मयत रवींद्र काळभोर यांच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शोभा रविंद्र काळभोर (वय ४२) आणि गोरख त्रंबक काळभोर (वय ४१) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. 

लोणी काळभोर परिसरातील वडाळे वस्ती येथे रविंद्र काशीनाथ काळभोर वय ४५ हे त्यांच्या राहत्या घराबाहेर पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात केली होती. तपासा दरम्यान आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता मयत रवींद्र काळभोर यांची पत्नी शोभा काळभोर आणि गोरख काळभोर यांचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. 

गावकऱ्यांशी चर्चा केल्यावर लक्षात आलं

या घटनेत डोक्यात कुणीतरी दगड मारून त्याचा खून केला अशी शक्यता वर्तवली जात होती. एकंदरीत घटनेच्या अनुषंगानं पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांशी चर्चा केल्यावर लक्षात आलं की पती अनैतिक संबंधात अडचण ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीनेच आपल्या पतीचा खून केला. या संशयावरून रवींद्र काळभोर पत्नी आणि तिच्या प्रियकराला चौकशीकरिता ताब्यात घेतलं आणि अधिक विश्लेषण तांत्रिक माहितीचं विश्लेषण आणि गावातून अधिक माहिती घेतली. बरेचसे पुरावे समोर आले आणि त्यामध्ये त्यांनी कबुल केलं की आमच्या संबंधाच्या मध्ये हा अडचण ठरत असल्यामुळं आम्ही काल रात्री दोनच्या सुमारास त्यांच्या डोक्यात हावडा मारून त्याचा खून केला.

दहा ते बारा वर्षापासून दोन्ही कुटुंबाची ओळख

आरोपी गोरख काळभोर आणि रवींद्र काळभोर हे शेजारी शेजारीच राहत होते. अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. रवींद्र काळभोर आणि गोरख काळभोर तशी एकाच गावातील राहणारी आहेत. दोघांच्या शेतीही आजूबाजूलाच आहेत. आणि शेतीकामाच्या निमित्तानं बऱ्याचशा गोष्टी ते आपसात सामायिक पद्धतीनंच करत आहेत. त्यामुळं दहा ते बारा वर्षापासून दोन्ही कुटुंबाची ओळख आहे. गोरख काळभोर यांचं रवींद्र यांच्या घरी येणं जाणं होतं. रवींद्र काळभोर यांना दारू पिण्याची सवय होती. आणि त्यातूनच दारू पिल्यानंतर ते आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेऊन तिला मारहाण वगैरे करत असे. आणि त्यात गोरख हस्तक्षेप करायचा. 

फोनवरून रचला कट  खरंतर मागील दहा वर्षांपासून गोरख काळभोर आणि शोभा काळभोर यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. आणि याच कारणावरून दोघा पती पत्नीसारखे भांडण देखील व्हायचे. हे वारंवार भांडण व्हायचं. मागील तीन दिवसापूर्वी गुढीपाडव्याच्या पूर्वी नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्याच्यामध्ये त्यांची दोन्ही मुलंही सध्या सुट्टीला असल्यामुळं घरीच होते. मग या भांडणांमुळं दोन्ही मुलांना घेऊन शोभा काळभोर माहेर थेरगाव याठिकाणी गेले होती. आणि त्याठिकाणाहून मग गोरख काळभोर आणि शोभा काळभोर यांनी फोनवरून हा कट रचला. सुरुवातीला त्यांनी ठरवलं होतं की त्यांना फक्त जायबंदी करावं जेणेकरून जागेवरून वगैरे हलता येणार नाही. परंतु ज्या पद्धतीनं नंतर त्यांनी हे ऑपरेट केलं. तो वर्मी घाव त्यांच्या डोक्यात लागला आणि त्यामध्येच मृत्यू झाला.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPune Crimeपुणे क्राईम बातम्याhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू