शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मित्रावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीचे रुग्णालयातून पलायन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 3:57 PM

अनुराग भाटीया याने त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी खडक पोलिसांनी त्याला अटक केली होती.

ठळक मुद्देशौचालयातील उघड्या खिडकीवाटे पलायन

पुणे : मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणातील अटक केलेल्या आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात नेले असताना त्याने खिडकीतून उडी मारुन पलायन केले़ ही घटना कमल नयन रुग्णालयात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली़ याप्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ अनुराग कमलेश भाटीया (वय २३, रा़ पाषाण सुस रोड) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग भाटीया याने त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी खडक पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलीस कोठडीत असताना त्याला रविवारी जुलाब व उलट्यांचा त्रास होत होता. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड व पोलीस नाईक सातपुते हे दोघे त्याला शिवाजी रस्त्यावरील कमलनयन रुग्णालयात घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याचे प्रिस्क्रीप्शन लिहून दिल्यानंतर औषधे आणण्यासाठी सातपुते गेले होते. त्यावेळी त्याने पुन्हा त्रास होत असल्याचे उमाजी राठोड यांना सांगितल्याने त्यांनी त्याला रुग्णालयातील शौचालयात नेले. मात्र, त्याने शौचालयातील उघड्या खिडकीवाटे पलायन केले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एस. पवार करत आहेत. ................ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक