शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बारामती पोलिसांचं 'कॉम्बिंग ऑपरेशन';खुनाच्या गुन्हयातील आरोपीला बनावट पिस्तूलसह अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 18:42 IST

बारामती परिसरामध्ये माळेगाव बु (ता. बारामती) येथे गोळीबाराची घटना घडली होती.

सांगवी : कॉम्बिंग ऑपरेशन व रेकार्डवरील आरोपी यांची तपास मोहीम दरम्यान खुनाच्या गुन्हयातील आरोपीकडे गावठी बनावटीचे  व दोन जिवंत काडतुसे मिळून आली असता त्याला बारामती तालुका पोलिसांनीअटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी बारामती परिसरामध्ये माळेगाव बु (ता. बारामती) येथे गोळीबार केल्याची घटना घडल्याने बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी बारामती परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी करून रेकॉर्डवरील आरोपींचा तपास मोहीम आखण्यात आली होती.

याबाबत बारामती तालुका गुन्हे शोध पथकाला सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार गुन्हे पथकातील अंमलदार बारामती तालुका पोलीस हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन, रेकार्डवरील आरोपी यांची तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. दरम्यान गुप्त माहितीदारामार्फत खुनाच्या गुन्हयातील जामिनावर असणारा आरोपी शुभम विकास राजापुरे हा येरवडा कारागृहातून पॅरोल रजेवर बाहेर आलेला आहे. सध्या त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असून असुन तो कमरेला लावून फिरत असतो अशी खात्रीलायक बातमी मिळाली होती. शुभम राजापुरे हा तांदुळवाडीमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच तिथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चौकशी दरम्यान एक गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन व दोन जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. शस्त्र परवाना नसल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश ढवाण,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे,राहुल पांढरे, नंदू जाधव,विजय वाघमोडे,विनोद लोखंडे,रणजित मुळीक यांनी केली.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक