Pune | पोलिसांच्या समोरच्या आरोपीने स्वत:वर केला ब्लेडने वार; देहुरोड येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 18:17 IST2023-02-22T18:16:48+5:302023-02-22T18:17:24+5:30
गुन्हा दाखल करत त्याला ससून रुग्णलायात ॲडमीट केले...

Pune | पोलिसांच्या समोरच्या आरोपीने स्वत:वर केला ब्लेडने वार; देहुरोड येथील घटना
पिंपरी : “मला पकडले तर तुम्हाला दाखवतो, मी आत्महत्या करतो.” असे म्हणत पोलिसांच्या समोरच आरोपीने स्वत:वर ब्लेडने वार करून घेतले. त्यामुळे आरोपीला ससून रुग्णलयात ॲडमिट केले आहे. ही घटना मंगळवारी (दि.२१) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास सेंट्रल चौक, देहुरोड येथे घडली. या प्रकरणी संतोष रामदास काळे ( वय ३५, रा. देहुगाव) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी जलसिंग राजपूतसिंग दुधानी (वय ३५, रा. जांभुळगाव) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला ससून रुग्णलायात ॲडमीट केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे पोलीस तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला ताब्यात घेत होते. मात्र, फिर्यादीला पोलिसांनी ओळखपत्र दाखवून ताब्यात घेत असताना आरोपीने अटक टाळण्यासाठी तो फिर्यादीच्या अंगावर धावून आला. तसेच स्वत:च्या जवळील ब्लेड हातमध्ये घेऊन फिर्यादीच्या चेहऱ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘मला पकडले तर तु्म्हाला दाखवतो, मी आत्महत्या करतो’ असे बोलून स्वत:चे हातावर ब्लेडने वार करून घेतले, असे फिर्यादीत नमूद आहे.