Pune Crime| खुनाच्या प्रयत्नातील आरोपीचे पुण्यात फलक, महापालिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 15:38 IST2022-02-28T15:05:06+5:302022-02-28T15:38:15+5:30
दोन दिवस उलटले तरी कारवाई झालेली नाही...

Pune Crime| खुनाच्या प्रयत्नातील आरोपीचे पुण्यात फलक, महापालिकेचे दुर्लक्ष
पुणे : शिवसैनिक संतोष परब (santos parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन सातपुते (sachin satpute) याचे वाढदिवसाचे फलक नगर रोड परिसरात झळकत आहेत; परंतु या अनधिकृत फ्लेक्सबाजीवर महापालिकेकडून अद्याप कारवाई झालेली नाही.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान १८ डिसेंबरला कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते याला पोलिसांनी अटक केली. सातपुते याला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीमधून बेड्या ठोकल्या. भाजप आमदार नितेश राणे यांचे समर्थक म्हणून सातपुते ओळखले जातात. त्याने पुणे महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
सातपुते अटकेत असतानाही त्याच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक त्याच्या समर्थकांनी मुख्य रस्त्याच्या बाजूला शुभेच्छा फलक झळकवले आहेत. दोन दिवस उलटले तरी कारवाई झालेली नाही. महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाकडे चौकशी केली असता विभाग प्रमुख विजय लांडगे यांनी कारवाई करण्याची सूचना लागलीच क्षेत्रीय कार्यालयास दिली जाईल, असे सांगितले आहे.