शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करणारा नराधम निघाला बड्या नेत्याचा कार्यकर्ता; माजी आमदारांच्या फ्लेक्सवरील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:52 IST

पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात एका नराधमाने तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

पुण्यातील स्वारगेट बसस्थाकामध्ये काल बुधवारी एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि शिवशाही बसमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तरुणीचा मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे, या रिपोर्टमध्ये तरुणीवर दोनवेळा लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथक तयार केली आहेत. तर दुसरीकडे आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपी एका बड्या नेत्याचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. 

मोठी बातमी..! स्वारगेट प्रकरणातील फरार आरोपी दत्ता गाडेसाठी पोलिसांचे १ लाखांचे बक्षीस

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो एका नेत्याच्या फ्लेक्सवरती आहे. हा फ्लेक्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फ्लेक्सवर आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो दिसत आहे. आरोपी गाडे हा शिरुर परिसरातील आहे. तो बॅनर शिरुर येथे लावण्यात आला असून बड्या नेत्यांच्या फ्लेक्सवर आरोपी गाडेचा फोटो आहे.

आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्याच्यावर याआधीही गुन्हे दाखल होते. यापूर्वीही आणखी कोणत्या मुलीसोबत असे कृत्य केले आहे  का, याचा शोध घेतला जात आहे. आरोपी गाडे याच्या घरी पोलिसांनी चौकशी केली असून त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  

 स्वारगेट एसटी स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार मंगळवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी घडला. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६, रा. शिक्रापूर) याने पीडित तरुणीला धमकावून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर पसार झाला.  या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीसह सात गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पुणेपोलिसांनी आठ पथके तयार केली असून, त्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे.  

आरोपीस पकडणाऱ्यास १ लाखाचे बक्षीसपुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी नागरिकांची मदत मागितली आहे. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस