शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात पोलिसाचा खून करून ११ वर्षे फरारी आरोपी अटकेत

By नितीश गोवंडे | Updated: March 2, 2025 14:28 IST

कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, फरारी झाल्यानंतर त्याने दोन विवाह केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

पुणे : कर्नाटकात पोलिस कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणात गेली ११ वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एकाला फुरसुंगी परिसरातून अटक करण्यात आली. विजापूरच्या शासकीय रुग्णालयातून आरोपी पसार झाला होता. तपासासाठी त्याला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, फरारी झाल्यानंतर त्याने दोन विवाह केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अमरीश काशिनाथ कोळी (४५, रा. कलबुर्गी, कर्नाटक, सध्या रा. गंगानगर, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोळी याने तीन विवाह केले आहेत. त्याच्या दोन पत्नी सोलापूरमध्ये राहायला आहेत. कर्नाटकातील गुलबर्गा परिसरात त्याची एक पत्नी राहायला आहे. कर्नाटकात पोलिस कर्मचाऱ्याचा खून केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. कारागृहातून त्याला उपचारासाठी विजापूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले होते. रुग्णालयातून तो पसार झाला होता. त्याला न्यायालयाने फरार घोषित केले होते. फरार झाल्यानंतर त्याने दोन विवाह केले.

फुरसुंगीतील गंगानगर भागात कोळी वास्तव्यास होता. कर्नाटकातील पोलिस कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणात कोळी गेले अकरा वर्षे फरार असल्याची माहिती फुरसुंगी पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याचे छायाचित्र किंवा निश्चित माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. फुरसुंगी पोलिसांनी कर्नाटकातील गुलबर्गा पोलिसांकडून माहिती मिळवली. २००९ मध्ये त्याने पोलिस कर्मचाऱ्याचा खून केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याने आजारी पडल्याचा बहाणा केला. त्याला विजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १४ ऑगस्ट २०१४ रोजी तो रुग्णालयातून पसार झाला. याप्रकरणी विजापूर येथील गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तो गेली ११ वर्षे सोलापूर आणि पुण्यात वेगळ्या नावाने वास्तव्य करत होता. कोळी फुरसुंगी परिसरात राहुल कांबळे आणि राजू काळे या बनावट नावांचा वापर करून वास्तव्य करत असल्याची माहिती फुरसुंगी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी सुनील कांबळे आणि वैभव भोसले यांना मिळाली. फुरसुंगी पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून आरोपी कोळी याची माहिती आणि छायाचित्र मिळवले. त्याची माहिती कर्नाटक पोलिसांना देण्यात आली. गुलबर्गा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी भीमा नायक आणि शशीकुमार हुगार हे बुधवारी पुण्यात आले. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मंगल मोढवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेश खांडे, कर्मचारी महेश उबाळे, सुनील कांबळे, वैभव भोसले यांनी ही कामगिरी केली. कोळी याने बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड काढले होते. रिक्षाचालक म्हणून काम करून, तसेच मजुरी करून तो उदरनिर्वाह करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक