शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kasba Vidhan Sabha: कसब्यातील मतदारांचे मत कुणाला? काय म्हणताहेत मतदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 18:26 IST

घराघरात लक्ष देणाऱ्या आणि संकटकाळात धावून येणाऱ्या धंगेकरांनाच कसब्यातील नागरिक मतदान करणार

पुणे : रवींद्र धंगेकर आमची काम करतात. आम्हाला भेटून विचारपूस करतात, आम्ही त्यांच्याकडे एक चांगला माणूस म्हणून बघत आहोत. आमच्या दृष्टीने धंगेकर हा देव आहे. तो नेहमी संकटाला धावून येतो अशा प्रतिक्रिया देत कसब्यातील नागरिकांनी धंगेकरांनाच मतदान करणार असल्याचे सांगितले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमतने कसब्यातील नागरिकांशी संवाद साधला. 

आगामी निवडणुकीत कसबा विधानसभेचे सध्याचे चित्र पाहता मागचेच स्पर्धक पुन्हा रिंगणात आहेत. म्हणजे २०२३ च्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, त्याच निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे हेमंत रासने अशीच ही लढत होणार आहे. पण आताची लढत दुरंगी नसून तिरंगी होणार असल्याचे दिसते आहे. कारण मनसेचे गणेश भोकरे या मैदानात उतरले आहेत. पण आता लोकांनी धंगेकरांना पसंती दिल्याचे वास्तव समोर आले आहे. हेमंत रासनेंबाबत विचारले असता ते आम्हाला कधी इथं दिसलेच नाहीत. अशीही उत्तरं नागरिकांनी दिली आहेत. मनसेच्या गणेश भोकरे यांच्याबाबत मात्र नागरिकांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.  

धंगेकर आले आमचं काम केलं, ड्रेनेज लाईन सुधारली. आम्हाला सुरळीत पाणी दिले, रासने कधी आलेच नाहीत, धंगेकर यावा अशीच आमची इच्छा असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. महिलांनी धंगेकर फिक्स येणारच असा विश्वासही यावेळी व्यक्त केला आहे. धंगेकरांना भेटायला भीती वाटत नाही. पण इतरांना भेटायला भीती वाटते असं म्हणत रासने कधी फिरकले नाहीत असंही नागरिक म्हणाले आहेत. धंगेकर आताही काम करतात आणि निवडून आल्यावरही करतील. प्रत्येकांच्या हाकेला ते उभे असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.  

कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता महाराष्ट्राचं नाव मोठं होईल असं बघतच नाही. स्थानिक आमदार पैकी सगळ्यांनी काम केलंय. पण आम्ही मतदानाच्या दिवशी योग्य व्यक्तीला मतदान करू असंही काहींनी सांगून आपलं मतं गुप्त ठेवल्याचे दिसून आलंय. आतापर्यंत धंगेकरला मतदान केलं. मग आता त्यालाच करणार. तो घराघरात लक्ष देतो. त्याने आमच्या नळाचं काम केलं. आमच्याकडे दुसरे कोणी आलेच नाहीत.अशी प्रतिक्रिया एका आजींनी दिली. आमच्या दृष्टीने धंगेकर देव आहे. संकटाला धावून येतो आम्ही त्यालाच मतदान करणार असल्याचे एका नागरिकाने सांगितले. मी ३०, ४० वर्षे शनिवार पेठेत राहिली आहे. पण आम्ही काँग्रेसला मत देत आलोय. गाडगीळ निवडून आले होते. आम्ही शनिवार पेठेत राहून पक्ष बदलला नाही. 

यंदा आघाडीचे सरकार यायला हवे. भाजपचा काही उपयोग नाही. धंगेकर कामाचा माणूस आहे. भाजप मनसे आपलं नाही. सगळी महागाई वाढली. आता सत्ता बदलायला पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार यायला हवे. यंदा कसब्यात काँग्रेसच येईल. असेही काही नागरिकांनी यावेळी अंगितले आहे. तर एका नागरिकाने हेमंत रासनेला मत देणार. आपली संस्कृती जपण्यासाठी आम्ही त्यांना आणि भाजपला मत देऊ असं सांगितलं आहे.   लोकसभेला कसबा विधानसभा मतदार संघातून रवींद्र धंगेकर यांना सर्वात कमी मतं मिळाली होती. त्यामुळे धंगेकर यांच्यासमोर धोक्याची घंटा आता वाजली आहे. तर तर हेमंत रासने यांनी पोटनिवडणुकीचा पराभव मनावर घेतला आहे. पराभवांनंतर ग्राऊण्ड लेव्हलवरून त्यांनी कामाला सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.  महाआरोग्य अभियान, लाडकी बहिण योजनेची नोंदणी मोहीम तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवलाय. परंतु अजूनही लोकांकडून धंगेकरांचे कौतुक ऐकायला मिळत आहे. शेवटी सर्वकाही मतदार राजावरच अवलंबुन असणार आहे. कसब्याचा बालेकिल्ला कोण जिंकणार?  हे २३ तारखेच्या निकालावरूनच स्पष्ट होणार आहे.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kasba-peth-acकसबा पेठravindra dhangekarरविंद्र धंगेकरMLAआमदारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती