शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

साखळी चोरीत आकडेवारीनुसार घट

By admin | Updated: August 31, 2015 04:14 IST

गेल्या काही वर्षांपासून पुणेकरांची डोकेदुखी ठरलेले सोनसाखळीचे गुन्हे कमी करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत

पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणेकरांची डोकेदुखी ठरलेले सोनसाखळीचे गुन्हे कमी करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे गुन्हे तब्बल १०० ने घटले आहेत. नुकतेच पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांकडून पकडलेला ऐवज ६० महिलांना सुपूर्द केला. गेल्या वर्षी आॅगस्टअखेरीस ३६७ गुन्हे घडले होते; तर चालू वर्षात आॅगस्टअखेरीस २६७ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. साखळी चोरीच्या यातील १४७ गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी ३७ आरोपींना अटक केली आहे. पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि सहआयुक्त सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविलेल्या छापासत्रामुळे या गुन्ह्यांचा आलेख खाली आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली आहे.पाठक, सहआयुक्त सुनील रामानंद यांनी योजना तयार करून राज्यातील सोनसाखळीचोरी करणाऱ्या ‘इराणी’ चोरट्यांच्या वस्त्यांची माहिती काढली. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी पथके तयार करून नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, मुंब्रा, नेरुळ, परळी वैजनाथ, पुण्यातील शिवाजीनगर आदी भागांमध्ये छापे टाकले.या ठिकाणांहून रेकॉर्डवरील तसेच सराईत सोनसाखळी चोरटे ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान काही चोरट्यांकडून सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. गेल्या आठ महिन्यांत पोलिसांनी १४७ गुन्हे उघडकीस आणले. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण तसेच गुन्हे कमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यासोबतच शहरातील रस्त्यांचा अभ्यास करून पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये फिरून नाकाबंदी पॉर्इंट निश्चित केले. नाकाबंदीदरम्यान नेमक्या कोणत्या दुचाकी आणि चारचाकी तपासायच्या याच्या सूचना दिल्या. त्याची अंमलबजावणी स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. यासोबतच सोनसाखळी चोरट्यांच्या मोठ्या टोळ्याच गजाआड करण्यात यश आल्यामुळे गुन्हे घटले आहेत. नागरिकही करतात प्रतिकारबहिणीसह शतपावली करण्यासाठी जात असलेल्या ३२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावताना या महिलेने तीन सोनसाखळी चोरट्यांना पकडून चोप द्यायला सुरुवात केली. गर्दी जमा होऊ लागताच हे तिघेही चोरटे पसार झाल्याची घटना बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर नुकतीच घडली होती.रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या आणि तरुणींच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. दोनच दिवसांपूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ७८ वर्षीय वृद्धेला खाली पाडून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यात आली. या घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटना रोखण्यात कमी पडत असलेल्या पोलिसांवर नाराजी व्यक्त होत होती. पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोनसाखळी चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला होता. आयुक्त पाठक यांनी याची गंभीर दखल घेत चोरट्यांचा बंदोबस्त करून हे गुन्हे कमी करण्यासाठी नागपूरमध्ये राबवलेल्या उपाययोजना पुण्यात राबवणार असल्याचे स्पष्ट केले होते. सोनसाखळी चोरट्यांनी गेल्या चार वर्षांत तब्बल ९ कोटी ९१ लाख ५८ हजार ८८२ रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यातील केवळ २ कोटी ८९ लाख ६५ हजार २५३ रुपयांचाच ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चार वर्षांमध्ये पोलिसांनी ४१० गुन्हेगारांना अटक केली असून यातील २८ आरोपी अल्पवयीन आहेत. पोलीस आयुक्त के. के. पाठक, पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांच्या सूचनांनुसार गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके तयार करून राज्यातील विविध भागांमध्ये वारंवार छापे टाकण्यात येत आहेत. त्यामुळे सोनसाखळी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या पुण्यातील हालचाली कमी झाल्या आहेत. यासोबतच सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास आता थेट पोलीस निरीक्षक करणार असल्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिल्यामुळे तपासात प्रगती होत आहे.- पी. आर. पाटील (उपायुक्त, गुन्हे शाखा) (प्रतिनिधी)