शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

चुकीने शाळेबाहेर पडलेली चिमुकली पालकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 8:32 PM

पोलिसांना मंगळवारी कर्वेनगर भागात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लहान मुलगी रडत असताना दिसली होती.

पुणे : शाळेत कार्यकम असल्याने एका वगार्तून दुस-या वर्गात जात असताना दुसरीत शिकणारी मुलगी चुकून शाळेतून बाहेर पडली. कर्वेनगर चौकात ती पोलिसांनी रडत उभी असल्याचे दिसले. त्यानुसार तिच्याकडे व परिसरातील शाळांमध्ये चौकशी करून कर्वेनगर पोलीस चौकीच्या पोलिसांनी तिला सुखरुपपणे पालकांच्या स्वाधीन केले.      वारजे-माळवाडी पोलीस ठाण्याच्या अंकित कर्वेनगर पोलीस चौकीत नेमणुकीस असलेल्या पोलीस नाईक अमर भोसले व पोलीस शिवाई संतोष गवारी यांना ही कामगिरी केली. पोलिसांना मंगळवारी कर्वेनगर भागात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लहान मुलगी रडत असताना दिसली होती. तिच्याकडे स्कूलबॅग व इतर साहित्य होते. मात्र, गणवेश नसल्याने तिच्या शाळेची माहिती समजू शकत नव्हती. तिला नाव पत्ता विचारला असता तिने अनन्या असे नाव सांगितले. मात्र, तिला पूर्ण नाव व पत्ता सांगता आला नाही. यामुळे तिला कर्वेनगर पोलीस चौकीत नेऊन तिचे दप्तर तपासण्यात आले. यामध्ये एका वहीवर तिचे नाव अनन्या अमोल काळे असो असल्याचे लक्षात आले. मात्र, तिच्या पालकांचा पत्ता आणि मोबाइल नंबर सापडला नाही. यामुळे पोलीस कर्मचा-यांनी त्या लहान मुलीचे मोबाइलमध्ये छायाचित्र काढून घेतले. कर्वेनगरमधील सर्व शाळांमध्ये जाऊन या मुलीचे छायाचित्र दाखवण्यात आले. यावेळी ही मुलगी सम्राट अशोक या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील असल्याचे समजले. त्यानुसार मुलीच्या पालकांना व शाळेच्या मुख्याध्यापकांना चौकीत बोलावून घेऊन तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. शाळेमध्ये एक कार्यक्रम असल्याने मुलांना एका वर्गातून दुस-या वर्गात नेत असताना मुलगी नजरचुकीने शाळेबाहेर गेल्याचे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Puneपुणेkarve nagar policeकर्वे नगर पोलीसStudentविद्यार्थीPoliceपोलिसSchoolशाळा