शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना मिळणार ५० हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 19:53 IST

विद्यार्थ्याचा अपघात होऊन तो जखमी झाल्यास त्याला ५० हजारांची, कायमचे अपंगत्व आल्यास १ लाखांची मदत केली जाणार आहे.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : सर्व महाविद्यालयांना मिळणार योजनेचा लाभ मागील वर्षी विमा संरक्षण योजनेमध्ये ५० विद्यार्थ्यांना या अपघात विमा योजनेअंतर्गत मदत

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालये, विभाग व संस्थांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशासनाकडून अपघात विमा उतरविण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्याचा अपघात होऊन तो जखमी झाल्यास त्याला ५० हजारांची, कायमचे अपंगत्व आल्यास १ लाखांची मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना १ लाख रूपयांची मदत केली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांसाठी ही अपघात विमा योजना राबविली जात आहे. अपघात योजनेचा आढावा घेण्यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, वित्त व लेखाधिकारी विद्या गारगोटे, आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत दुधगावकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांची समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सद्यस्थितीमध्ये वैद्यकीय खर्चाचा विचार करता विद्यार्थ्यांना औषधोपचाराच्या विमा रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचा ५ हजार रूपयांचा विमा उतरविला जात होता. त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी विमा संरक्षण योजनेमध्ये ५० विद्यार्थ्यांना या अपघात विमा योजनेअंतर्गत मदत करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांवर अपघात, दुर्घटना यामुळे एखादी आपत्ती कोसळल्यास त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होऊ नये या हेतूने विद्यार्थी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर यंदाच्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी या योजनेचे अधिक सुलभीकरण करण्यात आल्याचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रभाकर देसाई यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठAccidentअपघातStudentविद्यार्थी