शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

‘शिवशाही’ला दररोज होतोय अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 10:41 IST

‘शिवशाही’वर प्रश्नचिन्ह

ठळक मुद्देअपघातांचे सत्र थांबेना

पुणे : प्रवाशांना अधिक आरामदायी सेवा मिळावी यासाठी एसटी महामंडळाने अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शिवशाही बस अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. सोमवारी (दि. २५) कात्रज घाटाजवळ झालेल्या अपघातानंतर मागील सव्वा दोन वर्षांतील राज्यातील अपघातांचा आकडा ५५० वर गेला आहे. याचा अर्थ बसचे दररोज एक ते दोन अपघात होत असल्याने ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेशी तर तडजोड केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खासगी लक्झरी बससेवेला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने दि. १ जून २०१७ रोजी वातानुकूलित बससेवा सुरू केली. तिकीटदरही माफक असल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटीच्या ताफ्यात सध्या स्वत:च्या मालकीसह भाडेतत्त्वावरील १ हजार बसचा समावेश आहे. पण ही सेवा सुरू झाल्यापासून अपघातांचे सत्र कमी होताना दिसत नाही. सोमवारी (दि. २५) कात्रज घाटाजवळ शिंदेवाडी येथे शिवशाही बस दरीत कोसळून दोन प्रवाशांच्या मृत्यू झाला, तर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक-औरंगाबाद मार्गावर झालेल्या अपघातात काही प्रवासी जखमी झाले होते. हे अपघातांचे सत्र सुरूच राहिल्याने शिवशाहीच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.उपलब्ध आकडेवारीनुसार १ जून २०१७ ते २५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत शिवशाहीचे राज्यभरात ५५० लहान-मोठे अपघात झाले आहेत. यामध्ये प्राणांतिक अपघातांची संख्या ५१ वर पोहचली असून, ३७१ गंभीर तर ११५ किरकोळ स्वरूपाचे अपघात आहेत. एप्रिल २०१८ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान एकूण ४४२ अपघात झाले असून ४४ प्राणांतिक व ३०० गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. अपघातांच्या एकूण संख्येचा विचार केल्यास ही सेवा सुरू झाल्यापासून दररोज सरासरी एक ते दोन अपघात झाले आहेत. शिवशाहीच्या अपघातांचा मुद्दा विधानसभेतही गाजला होता. त्यानंतर एसटी महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा एसटी महामंडळाकडून केला होता. पण हा दावा फोल ठरला आहे...........मागील काही दिवसांतील अपघात४२५ नोव्हेंबर-शिंदेवाडी-२ मृत्यू, २५ जखमी४१७ नोव्हेंबर-नाशिक-औरंगाबाद महामार्ग-काही प्रवासी जखमी४७ नोव्हेंबर-पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवणजवळ -  ५ ते ७ प्रवासी गंभीर जखमी४३१ ऑक्टोबर-नाशिक-पुणे महामार्गावर-महिलेचा मृत्यू४३० ऑगस्ट-पुणे-सोलापूर महामार्गावर शेटफळजवळ-१ मृत्यू, १४ जखमी........अपघात टाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न एसटीतील वरिष्ठ अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार, शिवशाही ताफ्यात येण्यापूर्वीचे बसचे अपघात व शिवशाहीचे अपघात यामध्ये मोठी तफावत आहे. शिवशाहीच्या अपघातांमुळे तिच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित राहिले आहेत. पण या बस आरामदायी असल्याने प्रवाशांची पसंती मिळत आहे. अपघात टाळण्यासाठी महामंडळाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :PuneपुणेShivshahiशिवशाहीAccidentअपघात