शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Accident: पुणे - नगर महामार्गावरील अपघातात कंटेनरखाली दबून मायलेकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 20:12 IST

श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे पुणे - नगर महामार्गावर भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने कंटेनरखाली दबून झालेल्या अपघातात राळेगण सिद्धी ता. पारनेर येथील आई व मुलाचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देमुलाचा दीड वर्षापूर्वी झाला होता विवाह

शिरूर : श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे पुणे - नगर महामार्गावर भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने कंटेनरखाली दबून झालेल्या अपघातात राळेगण सिद्धी ता. पारनेर येथील आई व मुलाचा मृत्यू झाला आहे.     रविवारी सकाळी शिरूरवरून दुचाकीवर स्वप्नील बाळू मापारी ( वय २७ ) व त्यांची आई लक्ष्मीबाई बाळू मापारी ( वय ६२ ) हे राळेगण सिद्धीला घरी चालले होते. पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा कंटेनर दुभाजक तोडून नगर रोडवर पलटी झाला. त्याचवेळेस कंटेनर थेट त्यांच्या अंगावरच पलटी झाल्याने मायलेक कंटेनरखाली दबले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.      या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले. मन हेलावणारे दृश्य पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी आले. बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मारुती कोळप, पोलीस हवालदार भाऊसाहेब शिंदे, पोलीस काँन्स्टेबल संपत गुंड हे घटनास्थळी दाखल होऊन कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला.

सुखी संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला

स्वप्नील यांचा दिड वर्षापूर्वी विवाह झाला होता. सुखी संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला. नेहमी कष्ट करणारे मापारी कुटुंबातील स्वप्नील व त्यांची आई यांचे निधन झाल्याने संपूर्ण राळेगण सिद्धी परिवारावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :ShirurशिरुरAccidentअपघातPuneपुणेDeathमृत्यूPoliceपोलिस