Pune: शिक्रापूर-चाकण रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 17:20 IST2024-04-20T17:19:47+5:302024-04-20T17:20:52+5:30

शिक्रापूर ते चाकण रस्त्यावर साबळेवाडी गावाच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोलपंपाजवळ शुक्रवारी (दि. १९) हा अपघात झाला...

Accident on Shikrapur to Chakan road, two on two wheeler killed in collision with unknown vehicle | Pune: शिक्रापूर-चाकण रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

Pune: शिक्रापूर-चाकण रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

पिंपरी : अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार दोन तरुणांचा मृत्यू झाला. शिक्रापूर ते चाकण रस्त्यावर साबळेवाडी गावाच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोलपंपाजवळ शुक्रवारी (दि. १९) हा अपघात झाला.

लक्ष्मण राजू पवार (२५) आणि घनश्याम यादव (२५) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणांचे नाव आहे. मोहन भुजंगा शिंदे (४०, रा. माळवाडी, इंदुरी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहन शिंदे हे शिक्षक असून, त्यांचे भाचे जावई लक्ष्मण पवार आणि त्यांचा मित्र घनश्याम यादव हे दोघेही दुचाकीवरून शिक्रापूर ते चाकण रस्त्यावरून जात होते.

त्यावेळी साबळेवाडी गावच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोलपंपाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार लक्ष्मण आणि घनश्याम यांना तोंडाला, डोक्याला, कमरेला, हातापायाला दुखापत झाली. गंभीर जखमी झाल्याने लक्ष्मण आणि घनश्याम या दोघांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. पोलिस उपनिरीक्षक अभिजित चौगुले तपास करीत आहेत.

Web Title: Accident on Shikrapur to Chakan road, two on two wheeler killed in collision with unknown vehicle