भिमाशंकरकडे जाणा-या मंदोशी घाटात पिकअप पलटी;वीस प्रवाशी जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 20:08 IST2019-01-31T20:08:10+5:302019-01-31T20:08:28+5:30

वाहकाचा ताबा सुटल्याने  रस्त्यावर पिकअप पलटी झाला.

accident in mandoshi ghat road on Bhimashankar, the twenty passenger injured | भिमाशंकरकडे जाणा-या मंदोशी घाटात पिकअप पलटी;वीस प्रवाशी जखमी  

भिमाशंकरकडे जाणा-या मंदोशी घाटात पिकअप पलटी;वीस प्रवाशी जखमी  

ठळक मुद्देवीस प्रवाशी जखमी ; तिघांची प्रकृती चिंताजनक 

अयाज तांबोळी 
खेड /डेहणे: खेड तालुक्यातील भिमाशंकरकडे जाणा-या मंदोशी घाटात  (गुरुवार दि.३१) रोजी ४ वाजता वाहकाचा ताबा सुटल्याने  रस्त्यावर पिकअप पलटी झाला. याअपघात या पिकअप मधील वीस प्रवाशी जखमी झाले असुन जखमींना पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात दाखल केले आहे. गुरुवार हा तळेघरचा बाजार असल्याने परतीचा प्रवास करणा-या तीस ते पस्तीस प्रवाशांना घेवुन घाट मार्गे शिरगगावकडे निघालेल्या पिकअप क्र.(एमएच.१४.एएस. ३८७९) ला हा अपघात  घडला. यात वीस प्रवाशी जखमी झाले,  डेहणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात किरकोळ उपचारानंतर जखमींना सोडण्यात आले. तर गंभीर जखमी असलेल्या भागाबाई ठोकळ ,शांताराम ठोकळ ,शंकर शेळकंदे, ,किसन सातपुते,जाणकु सुरकुले,किसन गोडे, नारायण बानेरे, रंजना शेळकंदे,चंद्राबाई बानेरे यांना पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले  अपघाताची माहीती मिळाल्यावर लोकमतच्या माध्यमातून  पोलीस निरीक्षक जाधव यांना देण्यात आली आहे . गाडी कठडा तोडून न गेल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे. 

Web Title: accident in mandoshi ghat road on Bhimashankar, the twenty passenger injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.