शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत शिकाऊ विमानाचे चाक निखळल्याने अपघात; रेडबर्डची तिसरी घटना, जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 13:28 IST

उद्या जर एखादे विमान कोणाच्या घरावर किंवा कंपनीवर कोसळले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, भाजप पदाधिकाऱ्याचा सवाल

बारामती : बारामतीविमानतळावर शनिवारी (दि ९ ) सकाळी ७:४५ वाजता बारामती येथील रेड बर्ड एव्हीएशन या खासगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या विमानाला अपघात झाला. विवेक यादव (वय २४ वर्षे, मुंबई) हा प्रशिक्षणार्थी पायलट सदर विमान उडवत होता. नेहमीप्रमाणे प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाच्या पुढील टायरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन टायर वाकडे झाले आणि निखळले. रेड बर्ड चा हा गेल्या दोन वर्षातील तिसरा विमान अपघात आहे.

सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, मात्र या अपघातामुळे बारामतीतील नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सदर विमान जर एखाद्या घरावर, शाळेवर किंवा एमआयडीसीमधील एखाद्या कंपनीवर कोसळले असते, तर मोठी दुर्घटना घडली असती आणि जीवितहानी अटळ होती.

रेड बर्ड एव्हीएशन या संस्थेविरोधात यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. तरी देखील यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या संस्थेला नागरिकांच्या सुरक्षेचे कोणतेही गांभीर्य नाही. हे विमान शहराच्या रहिवासी भागाजवळून, शाळांजवळून  आणि औद्योगिक कंपन्यांच्या वरून उड्डाण करत असल्याने, प्रत्येक नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी. संस्थेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. शहराच्या नागरी वसाहतीजवळून होणारी प्रशिक्षण उड्डाणे थांबवण्यात यावीत. बारामतीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यात याव्यात. या गंभीर प्रकाराची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. बारामतीचे नागरिक सुरक्षित नाहीत. उद्या जर एखादे विमान कोणाच्या घरावर किंवा कंपनीवर कोसळले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस वैभव सोलनकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे दिवसांपूर्वी सोलनकर यांनी केंद्रीय विमान उड्डाणं मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे रेड बर्ड या संस्थेविषयी तक्रार करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAccidentअपघातairplaneविमानmurlidhar moholमुरलीधर मोहोळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा